मुख्य सामग्री पर जाएँ

CRIME NEWS : कोंढवा गोळीबार प्रकरणातील 'मोका’चा मुख्य आरोपी छ. संभाजीनगरमधून जेरबंद

गुन्हे शाखा युनिट ५ ची धडक कारवाई; चार महिन्यांपासून फरार असलेला शस्त्र पुरवठादार अटकेत

पघ
प्रशिक घस्ते

3 मिनट पठन

CRIME NEWS : कोंढवा गोळीबार प्रकरणातील 'मोका’चा मुख्य आरोपी छ. संभाजीनगरमधून जेरबंद

गुन्हे शाखा युनिट ५ ची धडक कारवाई; चार महिन्यांपासून फरार असलेला शस्त्र पुरवठादार अटकेत

पुणे CRIME NEWS: पुणे शहरातील कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका गंभीर गोळीबाराच्या आणि प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोका) गेल्या चार महिन्यांपासून फरार असलेल्या एका मुख्य संशयित आरोपीला पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखा युनिट ५ च्या पथकाने अत्यंत शिताफीने जेरबंद केले आहे.CRIME NEWS

या गुन्ह्यातील इतर आरोपींना प्राणघातक अग्निशस्त्रे (पिस्तूल व काडतुसे) पुरवणारा हा मुख्य सूत्रधार असून, तो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नाव बदलून लपून राहिला असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेऊन त्याला अटक केली. अटक करण्यात आलेला आरोपी हा पोलिसांच्या अभिलेखावरील अत्यंत अट्टल गुन्हेगार असून त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी कोंढवा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

आरोपींनी मिळून पूर्ववैमनस्यातून अग्निशस्त्राने प्राणघातक हल्ला केला
या संदर्भातील गंभीर कारवाईत अटक करण्यात आलेल्या मुख्य संशयित आरोपीचे नाव अजय उर्फ भज्या प्रकाश निकाळजे (वय ३२ वर्षे, रा. कोंढवा बुद्रुक) असे आहे. या आरोपीविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०९, ३२४(४), ३२४(५), ३(५), १८९(२), १८९(४), १९०, १९१(२), १९१(३), ६१(२) तसेच भारतीय हत्यार कायदा (आर्म्स ॲक्ट) कलम ३(२५)(२७), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५, फौजदारी कायदा दुरुस्ती अधिनियम (क्रिमिनल लॉ अमेंडमेंट) कलम ३ व ७ आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) १९९९ चे कलम ३(१)(ii), ३(२) व ३(८) अन्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये आरोपींनी मिळून पूर्ववैमनस्यातून एका व्यक्तीवर थेट अग्निशस्त्राने प्राणघातक हल्ला केला होता, ज्यामध्ये अजय उर्फ भज्या हा पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला होता.CRIME NEWS

गुप्त आणि विश्वसनीय बातमीदारांकडून खात्रीशीर तांत्रिक माहिती मिळाली
पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या अभिलेखावरील आणि मोकासारख्या गंभीर गुन्ह्यांतील फरारी गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट ५ चे पथक वेगवेगळ्या गुन्ह्यांचा समांतर तपास करत होते. या शोध मोहिमेदरम्यान पोलीस अंमलदार शशिकांत नाळे आणि राहुल ढमढेरे यांना त्यांच्या गुप्त आणि विश्वसनीय बातमीदारांकडून अत्यंत खात्रीशीर तांत्रिक माहिती मिळाली की, कोंढवा येथील गोळीबार प्रकरणात शस्त्रे पुरवून फरार झालेला मुख्य आरोपी अजय उर्फ भज्या निकाळजे हा सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड परिसरात नाव बदलून लपून बसला आहे.

माहितीच्या आधारे युनिट ५ च्या पथकाने तात्काळ छत्रपती संभाजीनगर गाठले. तेथील सिल्लोड तालुक्यातील अजिंठा परिसरातील इंदिरानगर भागात सापळा रचून पोलिसांनी अजय याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.CRIME NEWS

मुख्य आरोपीवर तब्बल १२ गंभीर गुन्हे दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पकडण्यात आलेला आरोपी अजय उर्फ भज्या निकाळजे हा अत्यंत सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, दंगल घडवणे, घरफोडी व चोरी, जबरी चोरी आणि वाहन चोरी यांसारखे तब्बल १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या सततच्या गुन्हेगारी कारवायांमुळे पोलिसांनी यापूर्वी त्याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यानुसार कडक कारवाई करून त्याला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध देखील केले होते.

मात्र, कारागृहातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा संघटित टोळीच्या माध्यमातून आपले गुन्हेगारी साम्राज्य सुरू केले होते. या मोका गुन्ह्यात प्रत्यक्ष गोळीबार करणाऱ्या इतर आरोपींना अग्निशस्त्रे पुरवण्यात त्याचा मुख्य सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.CRIME NEWS

सदरची उल्लेखनीय कामगिरी पुणे शहर पोलीस दलाच्या अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि साहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ५ चे पोलीस निरीक्षक संदीपान पवार यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार, पोलीस अंमलदार राहुल ढमढेरे, शशिकांत नाळे, विनोद शिवले, शहाजी काळे, प्रताप गायकवाड, उमाकांत स्वामी, अमर चव्हाण, अकबर शेख, अविनाश इंगळे, सुधीर सोनवणे, जयदेव भोसले, नासेर देशमुख तसेच महिला पोलीस अंमलदार नेत्रिका अडसूळ आणि मयुरी पालवे यांच्या पथकाने अत्यंत यशस्वीपणे केली आहे.

CRIME NEWS

शेयर करें