CRIME NEWS : चऱ्होली खुर्द येथे गुटखा वाहतूक प्रकरणी एकाला अटक
मोटारसायकल आणि गुटखा असा एकूण २८ हजार ३६० रुपयांचा माल जप्त
1 मिनट पठन

मोटारसायकल आणि गुटखा असा एकूण २८ हजार ३६० रुपयांचा माल जप्त
पिंपरी CRIME NEWS: शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधी गुटखा मोटारसायकलवरून विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या एका मजुराला पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. ही कारवाई गुरुवारी (२५ जून) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास चऱ्होली खुर्द गावच्या हद्दीतील वडगाव-आळंदी रोडवरील विश्रांतवाडी येथे करण्यात आली.CRIME NEWS

याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल हरिराम तुळशीराम डुमनर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रामदास शंकरराव शिंदे (३९, चऱ्होली खुर्द, खेड; मूळ रा. मनूर, नायगाव, नांदेड) या आरोपीला अटक करण्यात आली आहे.CRIME NEWS
पोलीस पेट्रोलिंग दरम्यान आरोपी रामदास हा त्याच्या ताब्यातील तांबड्या रंगाच्या होंडा शाईन मोटारसायकलवरून (एमएच २६ एए ३८८१) पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला ८ हजार ३६० रुपये किमतीचा गुटखा घेऊन जाताना आढळला. पोलिसांनी २० हजार रुपयांची मोटारसायकल आणि गुटखा असा एकूण २८ हजार ३६० रुपयांचा माल जप्त केला आहे. आळंदी पोलीस तपास करत आहेत.
CRIME NEWS
