Crime News : पुण्यात ५.७९ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; सराईत आरोपी अटकेत
'ड्रग-फ्री पुणे' मोहिमेंतर्गत अमली पदार्थ विरोधी पथक-१ ची कामगिरी
1 मिनट पठन

'ड्रग-फ्री पुणे' मोहिमेंतर्गत अमली पदार्थ विरोधी पथक-१ ची कामगिरी
पुणे, महाराष्ट्र मिरर, Crime News : पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथक-१ ने मोठी कारवाई करत तब्बल २ किलो ८९५ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ जप्त केला आहे. जप्त केलेल्या अमली पदार्थाची किंमत सुमारे ५ कोटी ७९ लाख रुपये असून, एका सराईत आरोपीला अटक करण्यात आली आहे.Crime News

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी 'ड्रग-फ्री पुणे' मोहिमेंतर्गत अमली पदार्थांची विक्री व तस्करी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अमली पदार्थ विरोधी पथक-१ रात्री गस्त घालत असताना ८ जुलै २०२६ रोजी पहाटे ४.४९ वाजता कात्रज चौकातील आयसीआयसीआय बँकेसमोरील नवीन उड्डाणपुलाखाली, सावंत कॉर्नर परिसरात संशयिताला ताब्यात घेण्यात आले.Crime News
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्रशांत सुरेश सावंत (वय ३८) असे असून, तो मूळचा येरवडा येथील रहिवासी असून सध्या लोहगाव रोड परिसरात राहत होता. त्याच्याकडील प्रवासी बॅगेची झडती घेतली असता २ किलो ८९५ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) आणि इतर साहित्य असा एकूण ५ कोटी ७९ लाख १० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एनडीपीएस कायदा कलम ८(क) व २१(क) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश कोतकर करत आहेत.Crime News
ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे), उपायुक्त (गुन्हे) आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथक-१ ने यशस्वीरीत्या पार पाडली.
Crime News
