Crime News : विद्येच्या माहेरघरात कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत होणार
पुणे, महाराष्ट्र मिरर Crime News : सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या पुण्याने आता माहिती- तंत्रज्ञानाचे प्रमुख केंद्र म्हणूनही जगात नावलौकिक मिळवला आहे.
2 मिनट पठन

पुणे पोलिस चोवीस तास अॅक्शन मोडवर
पुणे, महाराष्ट्र मिरर Crime News : सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या पुण्याने आता माहिती- तंत्रज्ञानाचे प्रमुख केंद्र म्हणूनही जगात नावलौकिक मिळवला आहे. त्यामुळे येथील कायदा - सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पुणे पोलिस चोवीस तास अॅक्शन मोडवर आहेत.Crime News
गुन्ह्यांचे स्वरूप आता बदलत असताना पोलिस प्रशासनही अधिक सतर्क आणि हायटेक होत गुन्हेगारीला आळा घालत आहे. सराईत गुन्हेगार, टोळ्या, अमली पदार्थांचे सेवन करणारे तसेच शस्त्र बाळगणाऱ्यांवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. किरकोळ वादाचे गंभीर गुन्ह्यात रूपांतर होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईलाही प्राधान्य दिले जात आहे.Crime News

पोलिस प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी ते २७ जुलै २०२६ या कालावधीत शहरात पन्नास खून, ऐंशी खुनाचे प्रयत्न आणि ८१४ दुखापतींच्या घटनांची नोंद झाली आहे. मात्र, गुन्हे घडल्यानंतर आरोपींचा शोध घेणे, त्यांच्यावर कारवाई करणे आणि संभाव्य गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. विशेषतः झोन-२ मध्ये स्वारगेट, सहकारनगर, पार्वती, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, भारती विद्यापीठ आणि आंबेगाव या भागांचा समावेश असून, या परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून विशेष लक्ष दिले जात आहे.Crime News
प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर
प्रेमसंबंधातील वाद, आर्थिक व्यवहार, जमीन-जुमला, कर्जाचे वाद, कौटुंबिक संघर्ष, टोळीयुद्ध आणि वर्चस्वाच्या लढाईतून होणारे हिंसक प्रकार रोखण्यासाठी पुणे पोलिसांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला जात आहे. संवेदनशील भागांमध्ये नियमित गस्त, संशयित व्यक्तींवर नजर तसेच सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे.
अमलीपदार्थविरोधी कठोर कारवाई
दारू आणि अमली पदार्थांच्या नशेतून किरकोळ वादाचे रूपांतर गंभीर गुन्ह्यात होऊ नये, यासाठी नशेचे अड्डे आणि अमली पदार्थांच्या व्यवहारांवर पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात आहे.Crime News

दहशत निर्माण करणाऱ्यांवर करडी नजर
शहरात कोयते, बंदुका यांसारख्या शस्त्रांचा वापर करून दहशत निर्माण करणाऱ्यांवरही पोलिसांची करडी नजर आहे. सोशल मीडियावरून धमक्या देणे, दहशत निर्माण करणे किंवा टोळीचे वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे.Crime News
गुन्हेगारांना थारा नाही
गुन्हेगारीचे स्वरूप बदलत असले तरी कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे पोलीस चोवीस तास सतर्क आहेत. प्रतिबंधात्मक कारवाई, तातडीचा तपास आणि सराईत गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासोबत नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. “गुन्हेगारांना थारा नाही” असा स्पष्ट संदेश पोलिसांनी दिला आहे.
