Crime News : पुणे हादरले! घोरपडी पेठ पोलीस चौकीसमोरच दिवसाढवळ्या गोळीबार
पुणे, महाराष्ट्र मिरर
1 मिनट पठन

Crime News : शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, घोरपडी पेठ परिसरात शुक्रवारी दिवसा ढवळ्या गोळिबार केल्याची घटना घडली.
पुणे, महाराष्ट्र मिरर
Crime News : शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, घोरपडी पेठ परिसरात शुक्रवारी दिवसा ढवळ्या पोलिसांच्या नाकावर टीच्चून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. घोरपडी पेठ पोलीस चौकीसमोरच दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी एका व्यक्तीवर बेछूट गोळीबार केला, ज्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. crime news ghorpadi peth firing

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुपारी अचानक घडलेल्या या हल्ल्यामुळे नागरिकμमध्ये घबराट उडाली. दोन्ही हल्लेखोर एका दुचाकीवरून आले होते. त्यांनी पूर्वनियोजित कटाप्रमाणे किंवा पूर्ववैमनस्यातून संबंधित व्यक्तीला लक्ष्य करत तिच्यावर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पसार होण्याचा प्रयत्न केला.
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांचे २६ दिवसांनंतर उपोषण समाप्त; केंद्र सरकारकडून मागण्या मान्य
मात्र, पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे व तात्काळ केलेल्या पाठलागामुळे गोळीबार करणाऱ्या संशयितांपैकी एकाला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. असे, या गुन्ह्यातील दुसरा मुख्य आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
जखमी रुग्णालयात दाखल
या गोळीबारात लक्ष्य केलेली व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, तिला तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात असून, वैयक्तिक दुश्मनी की अन्य काही कारण, याचा तपास पोलीस करत आहेत. crime news

घटनेची भीषणता लक्षात घेता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संपूर्ण परिसराची कसून नाकाबंदी करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यासमोरच घडलेल्या या प्रकारामुळे पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलीस हल्लेखोरांचा माग काढत आहेत.
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)
