मुख्य सामग्री पर जाएँ

CRIME NEWS : मंचर बसस्थानकातील सराईत चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश

६.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, चार आरोपी जेरबंद

पघ
प्रशिक घस्ते

2 मिनट पठन

CRIME NEWS : मंचर बसस्थानकातील सराईत चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश

६.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, चार आरोपी जेरबंद

पुणे, महाराष्ट्र मिरर, CRIME NEWS: मंचर बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या सराईत चोरट्यांच्या टोळीचा मंचर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी चार आरोपींना अटक करत तब्बल ६ लाख १२ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपींकडून तीन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या धडक कारवाईमुळे बसस्थानक परिसरात चोरी करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहे.CRIME NEWS

मिळालेल्या माहितीनुसार, मंचर येथील बसस्थानकात प्रवासी बसमध्ये चढत असताना किंवा गर्दीत उभे असताना त्यांच्या अंगावरील दागिने व मौल्यवान वस्तू चोरण्याच्या घटना सातत्याने घडत होत्या. याच पार्श्वभूमीवर १८ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मंचर एसटी स्थानकात नाशिक-पुणे बसमध्ये चढत असलेल्या शकुंतला मनोहर थिटे (६१, रा. मुकुंदवाडी रोड, मंचर) यांच्या हातातील सोन्याचे बांगडे अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत लंपास केले. याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.CRIME NEWS

पोलिसांची गुप्त माहिती आणि सापळा यशस्वी

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना मंचर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला.
दरम्यान, मंचर पोलिसांचे पथक रात्री गस्त घालत असताना आंबेगाव तालुक्यातील एकलहरे गाव परिसरात एचपी पेट्रोल पंपाजवळ बंद पडलेल्या मंगल कार्यालयाशेजारी संशयास्पदरीत्या उभी असलेली एम एच ४६-डब्ल्यू ३१८४ क्रमांकाची एर्टिगा कार आढळली. कारमध्ये चार जण संशयास्पद हालचाली करत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी त्यांची चौकशी केली. चौकशीत त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता चोरीच्या गुन्ह्यांची कबुली मिळाली.CRIME NEWS

अटक आरोपींकडून पोलिसांनी १ लाख ९२ हजार ४८० रुपये किमतीचे ४ तोळे सोन्याचे बांगडे, गुन्ह्यात वापरलेली ५ लाख रुपये किमतीची एर्टिगा कार असा एकूण ६ लाख ९२ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपी सराईत गुन्हेगार

पोलिसांनी अमोल सुरेश टिंडंगे (वय ४०), कपिल सुरेश टिंडंगे (वय ३८), दीपक वतन आभंगे (वय ४८), राजेश दीपक गांगंगे (वय ५८) या चार आरोपींना अटक केली आहे. हे सर्व आरोपी सुभाषवाडी, चांद्रपाडा, अंबरनाथ, जि. ठाणे येथील रहिवासी असून सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आले आहे. या आरोपींवर यापूर्वी कल्याण परिसरात एकूण १५ चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.CRIME NEWS

दरम्यान, ही टोळी राज्यातील विविध बसस्थानके आणि गर्दीच्या ठिकाणी प्रवाशांना लक्ष्य करत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

तीन गुन्ह्यांची उकल

पोलिस तपासात आरोपींनी यापूर्वी केलेले तीन गुन्हे उघडकीस आले असून त्यापैकी दोन गुन्हे खेड पोलीस स्टेशनमध्ये तर एक गुन्हा मंचर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवला गेला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी खेड विभाग, मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक यादव, पोलीस हवालदार शेखर भोईर, संजय नाडेकर, सुदाम घोडे, नंदकुमार आढरी, योगेश रोडे, अजित पवार, हनुमंत ढोबळे, सुनील काटे, अविनाश ढवळी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अतुल डेरे, संदीप फड आणि इतर कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.CRIME NEWS

प्रवाशांसाठी पोलिसांचे आवाहन

बसस्थानके, रेल्वे स्थानके आणि इतर गर्दीच्या ठिकाणी प्रवास करताना मौल्यवान दागिने व वस्तूंची काळजी घ्यावी, संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन मंचर पोलिसांनी केले आहे.

CRIME NEWS

शेयर करें