CRIME NEWS : खराडीत भोंदू बाबाचा भांडाफोड; ८ जणांना अटक
उच्चशिक्षित आयटी महिला अधिकाऱ्यावर १७ वर्षे अमानुष अत्याचार व छळ; खराडी पोलिसांची मोठी कारवाई
4 मिनट पठन

उच्चशिक्षित आयटी महिला अधिकाऱ्यावर १७ वर्षे अमानुष अत्याचार व छळ; खराडी पोलिसांची मोठी कारवाई
पुणे CRIME NEWS: पुणे शहर पोलीस दलाच्या खराडी पोलिसांनी उबाळेनगर येथील ‘माऊली सदन’ बंगल्यावर आणि आश्रमावर अत्यंत धाडसी छापा टाकून स्वतःला साक्षात परमेश्वराचा अवतार सांगणाऱ्या एका पाखंडी व निर्दयी भोंदू बाबासह त्याच्या ८ मुख्य साथीदारांना (ज्यामध्ये सहा महिलांचा समावेश आहे) अटक केली आहे.CRIME NEWS

या संशयित नराधमाने एका उच्चशिक्षित कॉर्पोरेट महिला अधिकाऱ्याच्या आणि तिच्या डॉक्टर पालकांच्या आंधळ्या धार्मिक श्रद्धेचा व विश्वासाचा गैरफायदा घेऊन त्यांचे मानसिक, भावनिक व आर्थिक नुकसान केले. आरोपीने सन २००९ ते २०२६ या प्रदीर्घ कालावधीत अघोरी प्रथांच्या नावाखाली पीडितेला स्वतःचे मूत्र पिण्यास भाग पाडले, विजेचे शॉक दिले, खोलीत गुप्त सीसीटीव्ही कॅमेरे लावून पाळत ठेवली, तिचा छळ केला आणि तिच्यावर वारंवार बळजबररीने लैंगिक अत्याचार केले.CRIME NEWS
याप्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह सामूहिक लैंगिक अत्याचार, गुन्हेगारी कट आणि अमानुष छळाचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी घटनास्थळावरून तब्बल २५ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुणे शहरात यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.CRIME NEWS
गुन्हा नोंदवून आठही जणांना तात्काळ बेड्या
या संदर्भातील अंगावर काटा आणणाऱ्या भीषण अत्याचार आणि छळप्रकरणी ४१ वर्षीय पीडित महिला अधिकाऱ्याने खराडी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दिली आहे. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी भोंदू बाबा राधामोहन मिश्रा (वय ५९ वर्षे, रा. खराडी), त्याचा मुख्य पुरुष साथीदार स्वामी कंवल नयन (वय ५८ वर्षे, रा. खराडी) आणि सहा महिला हस्तक कीर्ती हंसराज आहुजा (वय ३८ वर्षे, रा. खराडी), कनिका हंसराज आहुजा (वय ३४ वर्षे, रा. कुरुक्षेत्र, हरियाणा), खुशबू गजेंदर हुडीया (वय ३७ वर्षे, रा. खराडी), श्वेता अवधबिहारी मिश्रा (वय ३७ वर्षे, रा. खराडी), अमृता अवधबिहारी मिश्रा (वय ३२ वर्षे, रा. खराडी) आणि श्वेता संजय पांडे (वय २८ वर्षे, रा. खराडी) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ६१(२), ६४(२)(एम), ६८, ७४, ७५, ७७, १२३, ११५(२), ३५१(२) आणि ३(५) सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबतचा व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबतचा कायदा, २०१३ चे कलम ३, ४ व ५ अन्वये गुन्हा नोंदवून आठही जणांना तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, पीडित महिला ही मूळची हरियाणा राज्यातील असून ती पुण्यात एका नामांकित खाजगी माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपनीत वरिष्ठ पदावर नोकरी करते. तिचे आई-वडील पेशाने डॉक्टर आहेत. सुमारे २५ वर्षांपूर्वी सन २००१ मध्ये पीडितेचे वडील स्वामी कंवल नयन याच्या आश्रमात गेले होते, तिथूनच या कुटुंबाची ओळख हरियाणातील ‘गुरुदेव साधना धाम ट्रस्ट’ चालवणाऱ्या राधामोहन मिश्रा नावाच्या भोंदूबाबाशी झाली.CRIME NEWS
ईश्वर आणि दिव्य पुरुष असल्याचे भासवले
मिश्रा याने स्वतःला ईश्वर आणि दिव्य पुरुष असल्याचे भासवून डॉक्टर कुटुंबाचा पूर्ण विश्वास संपादन केला. आई-वडील त्याच्या भक्तीत पूर्णपणे आंधळे झाले होते. याचाच गैरफायदा घेऊन मिश्रा याने सन २००९ ते २०२६ दरम्यान पीडितेला आपल्या खराडी येथील आश्रमात आणि गुरुकुलात ठेवले. तेथे त्याने आपले सहकारी स्वामी कंवल नयन आणि इतर महिला आरोपींच्या साहाय्याने पीडितेवर बळजबररीने लैंगिक अत्याचार केले.
अत्यंत अमानुष छळ केला
पीडितेने विरोध केला असता तिला बेदम मारहाण करणे, विजेचे शॉक देणे आणि अघोरी प्रथांच्या नावाखाली स्वतःचे मूत्र पाजणे असे अत्यंत अमानुष छळ केले. आरोपींनी पीडितेच्या खोलीत गुप्त कॅमेरे लावून तिच्यावर पाळत ठेवली, तिचे वैयक्तिक व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल केले, पतीपासून घटस्फोट घेण्यास भाग पाडले आणि तिची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतली.CRIME NEWS
२५ लाख ७७ हजार २४० रुपयांचा संशयास्पद मुद्देमाल हस्तगत
पीडितेने अखेर अत्यंत धाडसाने आरोपींच्या तावडीतून सुटका करून घेत हरियाणा येथे आपल्या पालकांचा अंधश्रद्धेचा बुरखा फाडला. त्यानंतर खराडी पोलिसांनी गुन्हा दाखल होताच बंगल्यावर मध्यरात्री छापा टाकून सर्व आरोपींना जेरबंद केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्ह्यात वापरलेले आणि संशयास्पद पुराव्यांचे एकूण ८ फिरते संगणक (लॅपटॉप), ९ भ्रमणध्वनी (मोबाईल फोन), १९ कठीण माहिती साठवणूक चकत्या (हार्डडिस्क), २० ध्वनीचित्रफिती (कॅसेट्स), १० डिजिटल तबकड्या (डीव्हीडी), १ व्हिडिओ रेकॉर्डर यंत्र (डीव्हीआर), २ संगणक प्रक्रिया यंत्रणा (सीपीयू), २३ माहिती वाहक पेनड्राईव्ह, ६ लाख ६० हजार रुपयांची रोख रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण २५ लाख ७७ हजार २४० रुपयांचा संशयास्पद मुद्देमाल हस्तगत केला आहे.CRIME NEWS
पोलीस पथकाची धाडसी कामगिरी
सदरची उल्लेखनीय कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) गौहर हसन, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ-७) प्रशांत अमृतकर, साहाय्यक पोलीस आयुक्त (खराडी विभाग) नूतन पवार आणि साहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, साहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, पोलीस अंमलदार नवनाथ वाळके, नाणेकर, श्रीकांत शेंडे, सुरेंद्र साबळे आणि श्रीकांत कोद्रे यांच्या पथकाने अत्यंत धाडसाने केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण करत आहेत.
CRIME NEWS
