CRIME NEWS : दहशत माजविणाऱ्या तडीपार गुंडाला अटक
आरोपीला दोन वर्षांसाठी केले होते हद्दपार
1 मिनट पठन

आरोपीला दोन वर्षांसाठी केले होते हद्दपार
पिंपरी, महाराष्ट्र मिरर, CRIME NEWS: दोन वर्षांसाठी शहरातून हद्दपार केलेल्या आणि दहशत माजविणाऱ्या गुंडाला पोलिसांनी कोयत्यासह अटक केली. ही कारवाई गुरुवारी (११ जून) सकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास निगडी येथे करण्यात आली. साहिल उर्फ बंट्या सुरेश चव्हाण (२१, ओटास्कीम, निगडी) असे तडीपार गुंडाचे नाव आहे.CRIME NEWS

पोलीस हवालदार दत्तात्रय शिंदे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीला परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्तांनी दोन वर्षांसाठी हद्दपार केले होते. मात्र त्याने कोणतीही परवानगी न घेता हद्दीत प्रवेश केला आणि ट्रान्सपोर्टनगर येथील इमारतीजवळ हातात लोखंडी कोयता घेऊन फिरत असताना पोलिसांनी त्याला अटक केली.CRIME NEWS
निगडी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
CRIME NEWS
