CRIME NEWS : सिंहगड रोड येथे १६ लाखांची सायबर फसवणूक
फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये सुरुवातीला काही प्रमाणात नफा दाखवून फिर्यादीचा विश्वास जिंकला
1 मिनट पठन

फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये सुरुवातीला काही प्रमाणात नफा दाखवून फिर्यादीचा विश्वास जिंकला
पुणे CRIME NEWS: सिंहगड रोड परिसरातील एका ४१ वर्षीय व्यक्तीची फॉरेक्स ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून १६ लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.CRIME NEWS

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जून २०२५ ते १७ सप्टेंबर २०२५ या कालावधीत अज्ञात मोबाईलधारक, टेलिग्राम ग्रुप चालक आणि संबंधित बँक खातेदारांनी फिर्यादीशी संपर्क साधला. सुरुवातीला फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यानंतर काही प्रमाणात नफा दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यात आला.
यानंतर अधिक मोठा परतावा मिळण्याचे आश्वासन देत आरोपींनी वेळोवेळी अधिक रक्कम गुंतवण्यास प्रवृत्त केले. मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून विविध खात्यांमध्ये पैसे जमा करून घेत फिर्यादीची एकूण 16 लाख 54 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.CRIME NEWS
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१९(२), ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६6(ड) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आरोपी अद्याप फरार असून मोबाईल क्रमांक, टेलिग्राम खात्यांची माहिती आणि आर्थिक व्यवहारांच्या आधारे तपास सुरू आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.CRIME NEWS
CRIME NEWS
