Crime News : बनावट ई-मेलसह खोट्या नोंदीद्वारे कंपनीची अडीच कोटींची फसवणूक
पुणे, महाराष्ट्र मिरर Crime News : कंपनीने दाखविलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेत एका कर्मचाऱ्याने बनावट ई-मेल, खोटी बिले, व्हाउचर आणि इलेक्ट्रॉनिक नोंदी तयार करून २ कोटी ४५ लाख ३६ हजार ५८४ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
1 मिनट पठन

बाणेर पोलिस ठाण्यात कर्मचाऱ्यावर गुन्हा
पुणे, महाराष्ट्र मिरर Crime News : कंपनीने दाखविलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेत एका कर्मचाऱ्याने बनावट ई-मेल, खोटी बिले, व्हाउचर आणि इलेक्ट्रॉनिक नोंदी तयार करून २ कोटी ४५ लाख ३६ हजार ५८४ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.Crime News

कौस्तुभ शिवकुमार विभुते (वय ३४, रा. मुंढवा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. योगेश दीपांकर (वय ४४, रा. बालेवाडी) यांनी याबाबत फिर्याद आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने कंपनीच्या निधीचा अपहार करण्याच्या उद्देशाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने बनावट खर्च परतावा, खोटी व्हाउचर, इलेक्ट्रॉनिक नोंदी आणि ई-मेल तयार केले. त्यानंतर कंपनीच्या ईआरपी प्रणालीतील माहिती तसेच बँक खात्यांचे तपशील बदलून आर्थिक व्यवहारांमध्ये फेरफार केला. विशेष म्हणजे, मूळ विक्रेत्यांची नावे आणि बिल क्रमांक तसेच ठेवण्यात आले; मात्र लाभार्थी बँक खाते, आयएफएससी कोड आणि पेमेंटची माहिती बदलून संबंधित रक्कम प्रत्यक्ष विक्रेत्यांऐवजी आरोपीने स्वतःच्या बँक खात्यात वर्ग केली.Crime News
याशिवाय आरोपीने कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट ई-मेल तयार करून ते अधिकृत आदेश असल्याचा भास निर्माण केला. संबंधित विभागाने स्वतंत्र पडताळणी न करता त्या ई-मेलवर विश्वास ठेवून आरोपीने दिलेल्या खात्यांमध्ये रक्कम वर्ग केल्याने कंपनीची मोठी आर्थिक फसवणूक झाली. हा प्रकार ११ जून २०२४ ते ३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घडला असून, २० जुलै २०२६ रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक विजय खिल्लारे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Crime News
