CRIME NEWS : मोका गुन्ह्यातील चार महिन्यांपासून फरार आरोपीला जेरबंद
अग्निशस्त्राच्या साहाय्याने फिर्यादीवर जीवघेणा हल्ला केला होता
1 मिनट पठन

अग्निशस्त्राच्या साहाय्याने फिर्यादीवर जीवघेणा हल्ला केला होता
पुणे CRIME NEWS : 'मोका' अंतर्गत दाखल गंभीर गुन्ह्यातील तब्बल चार महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला कोंढवा पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. आरोपीवर खूनाचा प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, दरोडा, संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) यांसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल आहे.
कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आरोपींनी अग्निशस्त्राच्या साहाय्याने फिर्यादीवर जीवघेणा हल्ला केला होता. या प्रकरणात शस्त्र पुरवणारा व गुन्ह्यातील फरार आरोपी गणेश तुकाराम घावरे (वय २८) याचा शोध सुरू होता.CRIME NEWS

दरम्यान, आरोपी गणेश घावरे हा कोंढवा परिसरात वास्तव्य करत असल्याची गोपनीय माहिती पोलिस अंमलदार राहुल दमडरे यांना मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिस पथकाने सापळा रचला. त्यानंतर काकडे वस्ती परिसरातील साईकृपा बिल्डिंगजवळील एका खोलीतून त्याला ताब्यात घेण्यात आले. पुढील चौकशी व कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला कोंढवा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.CRIME NEWS
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे), गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-2) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक संदीपान पवार यांच्या सूचनेनुसार पोलिस अंमलदार राहुल दमडरे, शहाजी काळे, सुधीर सोनवणे आणि नासेर देशमुख यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.
CRIME NEWS
