मुख्य सामग्री पर जाएँ

CRIME NEWS :पर्वती परिसरात तरुणाला मारहाण करून ४१ हजारांचा ऐवज लुटला

दोन आरोपी अटकेत; दोघे फरारी

पघ
प्रशिक घस्ते

1 मिनट पठन

CRIME NEWS :पर्वती परिसरात तरुणाला मारहाण करून ४१ हजारांचा ऐवज लुटला

दोन आरोपी अटकेत; दोघे फरारी

पुणे CRIME NEWS: पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका २५ वर्षीय तरुणाला मारहाण करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण ४१ हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन आरोपी अद्याप फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण (वय २५, रा. बिबवेवाडी) यांच्या तक्रारीवरून प्रमोद अंकुश काळंबे (वय २१, रा. पर्वती दर्शन), बसवराज ऊर्फ अभिषेक राजेंद्र पाटील (वय 20, रा. जनता वसाहत) तसेच दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(६) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.CRIME NEWS

ही घटना ६ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास वेताळबाबा मंदिर, गोरक्षनाथ मठ परिसरात घडली. आरोपींनी फिर्यादीला चाकूचा धाक दाखवत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांच्याजवळील २४ हजार रुपये रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण ४१ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.CRIME NEWS

या प्रकरणी पोलिसांनी प्रमोद काळंबे आणि बसवराज ऊर्फ अभिषेक पाटील यांना अटक केली असून अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण पवार करीत आहेत.

CRIME NEWS

शेयर करें