CRIME NEWS : चिंचवड येथे परदेशी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने ८८ लाख लांबवले
बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्यास २०० ते ३०० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष
1 मिनट पठन

बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्यास २०० ते ३०० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष
पिंपरी CRIME NEWS: परदेशी शेअर मार्केट, स्टॉक मार्केट आणि बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्यास २०० ते ३०० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीला तब्बल ८८ लाख रुपयांना गंडवले. ही घटना ९ फेब्रुवारी ते ६ जून २०२६ दरम्यान वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे ऑनलाईन माध्यमातून घडली.CRIME NEWS

या प्रकरणात पीडित व्यक्तीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार एक लिंक धारक, समृद्धी आणि प्रथम पटेल नावाचे व्हाट्सॲप क्रमांक वापरकर्ते तसेच विविध बँकांच्या २० खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.CRIME NEWS
आरोपींनी फिर्यादीला गुंतवणुकीची लिंक पाठवून परदेशी मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडले. फिर्यादीने सुरुवातीला गुंतवलेल्या १ लाख २० हजार ९०० रुपयांवर ५० हजार ३४९ यूएस डॉलर इतका मोठा नफा दाखवण्यात आला. हा नफा काढण्यासाठी फिर्यादीने विड्रॉल रिक्वेस्ट टाकली असता, आरोपींनी कन्वर्जन फी, कॅपिटल गेन टॅक्स, सेबी चार्जेस, जीएसटी यांसारख्या वेगवेगळ्या शुल्काचे कारण सांगून फिर्यादीकडून एकूण ८८ लाख २६ हजार ३४२ रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर भरून घेतले व ती रक्कम परत न करता फसवणूक केली. सायबर पोलीस तपास करत आहेत.
CRIME NEWS
