CRIME NEWS : हिंजवडीत चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून पावणेसात लाखांची फसवणूक
तरुणाला ६ लाख ८७ हजाराचा ऑनलाईन गंडा
1 मिनट पठन

तरुणाला ६ लाख ८७ हजाराचा ऑनलाईन गंडा
पिंपरी CRIME NEWS: आपका वर्क कन्सल्टींग आणि डोलेज इंडिया या कंपन्यांमधून चांगला जॉब मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची लाखो रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना ७ एप्रिल २०२५ ते ३ जानेवारी २०२६ दरम्यान ऑनलाईन माध्यमातून हिंजवडी येथे घडली. याप्रकरणी २५ जून २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.CRIME NEWS

या प्रकरणात लक्ष्मीकांत सुधाकर अनजनकर (३६, रा. माण; मूळगाव- नागपूर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विविध ईमेल आयडी, मोबाईल नंबर धारक आणि बँक खाते धारक अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.CRIME NEWS
आरोपींनी फिर्यादीला ईमेलद्वारे संपर्क साधून चांगला जॉब मिळवून देण्यासाठी रजिस्ट्रेशन व इतर वेगवेगळ्या कारणांसाठी बँक खात्यावर पैसे भरण्यास सांगितले. फिर्यादीने वेळोवेळी एकूण ६ लाख ८७ हजार ९८४ रुपये भरूनही त्यांना कोणतीही नोकरी देण्यात आली नाही. पैसे परत मागूनही प्रतिसाद न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसात धाव घेतली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
CRIME NEWS
