Crime News : फटाका फोडणाऱ्या ‘बुलेट राजां‘वर कारवाईचा बडगा
पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी Crime News : बुलेट मोटारसायकलींना मॉडिफाइड (फटाका) सायलेंसर बसवून मध्यरात्री मोठ्या आवाजात दहशत निर्माण करणाऱ्या तरुणांविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई करत अकरा बुलेट जप्त करण्यात आल्या आहेत.
1 मिनट पठन

काळेपडळ पोलिस ठाण्यात सोळा जणांवर गुन्हा दाखल; अकरा बुलेट जप्त
पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी Crime News : बुलेट मोटारसायकलींना मॉडिफाइड (फटाका) सायलेंसर बसवून मध्यरात्री मोठ्या आवाजात दहशत निर्माण करणाऱ्या तरुणांविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई करत अकरा बुलेट जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच, सोळा जणांवर काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मॉडिफाइड सायलेंसर बसविणाऱ्या गॅरेज चालकांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोंढवा चौक, न्याती चौक, रहेजा व्हिस्टा चौक, उंड्री आणि मोहम्मदवाडी परिसरात काही तरूण शुक्रवारी (दि. ३१) रोजी रात्री ११ ते शनिवारी पहाटे ५ वाजेपर्यंत बुलेट आणि इतर मोटारसायकलींना फटाका सायलेंसर लावून मोठा आवाज करत भरधाव वेगाने वाहन चालवत होते. तरूणांच्या या धिंगाण्यामुळे परिसरातील नागरिक, वृद्ध आणि लहान मुले घाबरल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे संबंधित वाहनचालकांचा शोध घेत कारवाई केली.Crime News

दरम्यान, तरूणांच्या या धिंगाण्याचे व्हीडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. पोलिसांनी या ‘बुलेट राजां‘ वर कारवाई करत अकरा बुलेट जप्त करत सर्व मॉडिफाइड फटाका सायलेंसर काढून नष्ट करण्यात आले आहेत. तसेच मॉडिफाइड सायलेंसर बसविणाऱ्या तीन गॅरेज चालकांविरुद्धही स्वतंत्र कारवाई करण्यात आली आहे.Crime News

ही कारवाई पोलीस उपायुक्त (परिमंडळ-६) यांच्या मार्गदर्शनाखाली काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखेचे अधिकारी आणि विशेष पथकाने संयुक्तरीत्या केली.Crime News
यापुढेही कठोर कारवाई करणार
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले, “फटाका सायलेंसर लावून ध्वनी प्रदूषण निर्माण करणे, नागरिकांमध्ये दहशत पसरविणे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार आहे, अशा प्रकारांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही.”
