रवींद्र धंगेकर आणि भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांच्यातील वाद टोकाला; सोशल मीडियावरील पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
•अरे बेट्या तुझे मालक लोक पण वाकड्यात जात नाही आमच्या…"; धंगेकरांच्या आक्रमक पोस्टमुळे युतीमधील संघर्ष चव्हाट्यावर.
1 मिनट पठन

•अरे बेट्या तुझे मालक लोक पण वाकड्यात जात नाही आमच्या…"; धंगेकरांच्या आक्रमक पोस्टमुळे युतीमधील संघर्ष चव्हाट्यावर.
पुणे :- विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधील वाद दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला आहे. भाजप प्रवक्ते नवनाथ बन आणि शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांच्यातील शाब्दिक युद्ध आता विक टोकाला पोहोचले असून, धंगेकरांनी सोशल मीडियावर केलेल्या एका वादग्रस्त पोस्टमुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
रवींद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत अत्यंत कडक शब्दांत नवनाथ बन यांच्यावर निशाणा साधला आहे. "अरे बेट्या तुझे मालक लोक पण वाकड्यात जात नाही आमच्या, कधी तुझी नसबंदी होईल कळणार सुद्धा नाही तुला," असा थेट शब्दांत दम देत धंगेकरांनी या पोस्टला काही वादग्रस्त हॅशटॅग्सही जोडले आहेत. यापूर्वी नवनाथ बन यांनी धंगेकरांवर टीका करताना ते अनेक पक्ष बदलून आल्याची टीका केली होती, ज्याला प्रत्युत्तर देताना धंगेकरांचा हा आक्रमक पवित्रा समोर आला आहे.
महाराष्ट्राचा सातबारा तुमच्या बापाचा आहे का?; नवनाथ बन यांचे प्रत्युत्तर
रवींद्र धंगेकर यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनीही पत्रकार परिषद घेत तीव्र शब्दांत पलटवार केला आहे. "देवेंद्रजींवर टीका करण्याआधी आत्मपरीक्षण करावे. बारा पक्ष फिरून आलेल्या नेत्याने आमच्यावर बोलू नये," असे म्हणत बन यांनी धंगेकरांना धारेवर धरले.
तसेच, "धंगेकर म्हणतात महाराष्ट्रात फिरू देणार नाही, धमकी कोणाला देता, महाराष्ट्राचा सातबारा तुमच्या बापाचा आहे का?" असा सवाल करत बन यांनी थेट आव्हान दिले आहे. विधान परिषद निकालानंतर महायुतीमधील दोन नेत्यांमधील हा कलगीतुरा आणि पातळी सोडून सुरू असलेली टीका सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली असून, यामुळे युतीमधील अंतर्गत दुरावा आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
