मुख्य सामग्री पर जाएँ

Pune News : कोलंबो इंटरनॅशनल मॅरेथॉनमध्ये ज्युलियस ओचिएंग प्रथम; 2 तास 18 मिनिटे 15 सेकंदांची वेळ

Pune News :पुणे : श्रीलंकेत 13 सप्टेंबर 2026 रोजी झालेल्या कोलंबो इंटरनॅशनल मॅरेथॉनमध्ये ज्युलियस ओचिएंग (Julious Ochieng) यांनी प्रथम क्रमांक पटकावल्याची माहिती ‘Marathon Legend 369’ कंपनीने दिली आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

कोलंबो इंटरनॅशनल मॅरेथॉनमध्ये ज्युलियस ओचिएंग प्रथम
कोलंबो इंटरनॅशनल मॅरेथॉनमध्ये ज्युलियस ओचिएंग प्रथम

Pune News :पुणे : श्रीलंकेत 13 सप्टेंबर 2026 रोजी झालेल्या कोलंबो इंटरनॅशनल मॅरेथॉनमध्ये ज्युलियस ओचिएंग (Julious Ochieng) यांनी प्रथम क्रमांक पटकावल्याची माहिती ‘Marathon Legend 369’ कंपनीने दिली आहे. ओचिएंग यांनी 2 तास 18 मिनिटे 15 सेकंदांत मॅरेथॉन पूर्ण केल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. ओचिएंग यांनी या स्पर्धेत भारतातील ‘Marathon Legend 369’ कंपनीचे प्रतिनिधित्व केले. कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) विशाल धोंडिबा शिळीमकर तसेच प्रशासकीय संचालक शिवांगी बहल यांनी ओचिएंग यांना यंदाच्या कोलंबो इंटरनॅशनल मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी सहकार्य केल्याचे कंपनीने म्हटले आहे.अशी माहिती विशाल धोंडिबा शिळीमकर यांनी पुण्यात दिली https://maharashtramirror.com/ Pune News

आंतरराष्ट्रीय स्तरावर गुणवत्तापूर्ण मॅरेथॉनपटूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विविध देशांतील चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना कंपनीशी जोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ‘Marathon Legend 369’कडून सांगण्यात आले. अशा खेळाडूंना विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक पाठबळ देण्यावर भर असल्याचेही कंपनीने नमूद केले. कोलंबोमधील या कामगिरीमुळे ओचिएंग यांच्यासह ‘Marathon Legend 369’चे नाव आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन क्षेत्रात पुढे आले आहे. आगामी काळातही विविध देशांतील प्रतिभावान धावपटूंना संधी देण्याचा कंपनीचा मानस असल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेयर करें