Coep शुल्कवाढीवरून अभाविप आक्रमक
पुणे, महाराष्ट्र मिरर
1 मिनट पठन

coep विद्यार्थ्यांचा संताप, प्रशासनाकडून समितीच्या अहवालाची प्रतीक्षा
पुणे, महाराष्ट्र मिरर
Coep : सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी जाहीर करण्यात आलेल्या शुल्कवाढीविरोधात विद्यार्थ्यांचा विरोध तीव्र होत असून, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) विद्यापीठ प्रशासनाला पुन्हा निवेदन देत शुल्कवाढीचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अभाविपने दिला आहे. coep fee hike controversy abvp protest pune

प्रशाशनाची वेळकाढू भूमिका
अभाविपने २३ जुलै रोजी कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात शुल्कवाढ तात्पुरती स्थगित करणे, शुल्कवाढीमागील आर्थिक कारणे सार्वजनिक करणे, शासनाकडून अतिरिक्त निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणे, शुल्कवाढीमध्ये नियमितता ठेवणे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत योजना लागू करण्याची मागणी केली होती. मात्र, अद्याप कोणताही अंतिम निर्णय जाहीर झालेला नसल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी वाढत आहे. coep
Brijbhushan Singh महिला कुस्तीपट्टूंच्यालैंगिक छळ प्रकरणी निर्दोष मुक्त
विद्यार्थ्यांची नाराजी
अभाविपचे पुणे महानगर मंत्री म्हणाले, "सीओईपीसारख्या सार्वजनिक विद्यापीठात अचानक मोठ्या प्रमाणात शुल्कवाढ करणे विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे आहे. अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू ठेवणेही कठीण होणार आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांचा आवाज ऐकून तातडीने शुल्कवाढ मागे घ्यावी. अन्यथा विद्यार्थ्यांसह तीव्र लोकशाही आंदोलन उभारले जाईल." coep

एका विद्यार्थ्याने सांगितले, "आमच्या कुटुंबावर आधीच आर्थिक ताण आहे. एवढी शुल्कवाढ परवडणारी नाही. गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, पण त्यासाठी विद्यार्थ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकणे योग्य नाही." तर एका पालकाने प्रतिक्रिया देताना म्हटले, "प्रवेश प्रक्रियेच्या काळात अचानक शुल्कवाढ जाहीर झाल्याने पालकांचे संपूर्ण आर्थिक नियोजन कोलमडले आहे. विद्यापीठाने पारदर्शक भूमिका घेत विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा."

हरकती आणि सूचनांचा अभ्यास करणार
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ प्रशासनाने यापूर्वी स्पष्ट केले आहे की, शुल्कवाढीबाबत विद्यार्थ्यांकडून आलेल्या हरकती आणि सूचनांचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून, समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. तोपर्यंत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.
Crime News : फटाका फोडणाऱ्या ‘बुलेट राजां‘वर कारवाईचा बडगा
दरम्यान, समितीच्या अहवालाकडे विद्यार्थी, पालक आणि अभाविपचे लक्ष लागले असून, प्रशासनाकडून लवकरच भूमिका स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.coep
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)
