मुख्य सामग्री पर जाएँ

Delhi News : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’चा दिल्ली मार्च मागे

Delhi News : दिल्ली : सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (सीजेपी) येत्या ५ सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये काढण्यात येणारा प्रस्तावित मार्च मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’चा दिल्ली मार्च मागे
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’चा दिल्ली मार्च मागे

Delhi News : केंद्राच्या सकारात्मक आश्वासनासह न्यायालयाच्या भूमिकेचा विचार; ५ सप्टेंबरचा प्रस्तावित मार्च रद्द

Delhi News : दिल्ली : सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (सीजेपी) येत्या ५ सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये काढण्यात येणारा प्रस्तावित मार्च मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. केंद्र सरकारकडून मिळालेले सकारात्मक आश्वासन आणि सुप्रीम कोर्टाने मंगळवारी दिलेला आदेश यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. https://maharashtramirror.com/ Delhi News
सीजेपीने यापूर्वी विविध मागण्यांसाठी ५ सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये मोठा मार्च काढण्याची घोषणा केली होती. मात्र, मंगळवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर पक्षाने आपल्या भूमिकेत बदल केला आहे. केंद्र सरकारकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद, न्यायालयाची प्रतिष्ठा आणि सुनावणीदरम्यान मिळालेला आदेश या सर्व बाबींचा विचार करून आंदोलनाचे आवाहन मागे घेणे योग्य असल्याचे पक्षाने म्हटले आहे.
सीजेपीचे को-कन्व्हीनर सौरव दास यांनी सुनावणीदरम्यान न्यायालयाला पक्षाची भूमिका स्पष्ट केली. केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर तसेच न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा विचार करता, प्रस्तावित मार्च मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. https://maharashtramirror.com/ Delhi News
दरम्यान, सुनावणीवेळी सॉलिसिटर जनरल यांनी केंद्र सरकारची बाजू न्यायालयासमोर मांडली. आंदोलकांच्या मनात सरकारकडून दिलेली आश्वासने प्रत्यक्षात पूर्ण होतील की नाही, याबाबत शंका निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर दिल्ली मार्चची घोषणा करण्यात आली होती, असे त्यांनी स्पष्ट केले. https://maharashtramirror.com/ Delhi News
आता केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली असून, न्यायालयाच्या आदेशानंतर आंदोलकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा सॉलिसिटर जनरल यांनी व्यक्त केली. त्यामुळे ५ सप्टेंबरचा प्रस्तावित दिल्ली मार्च मागे घेण्याचा सीजेपीचा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

शेयर करें