मुख्य सामग्री पर जाएँ

CM Fadnavis Birthday : फडणवीसांच्या वाढदिवसाला पवार-ठाकरे गटातून कौतुकाचा वर्षाव! महाराष्ट्रात राजकारणाची समीकरणं बदलतायत का?

Sharad Pawar On Devendra Fadnavis Birthday: शरद पवार म्हणतात – "देवेंद्रांची कामाची गती अफाट", उद्धव ठाकरेंकडूनही राष्ट्रीय स्तरावर जबाबदारी मिळण्याच्या शक्यतेचा उल्लेख

व
विवेक

1 मिनट पठन

CM Fadnavis Birthday : फडणवीसांच्या वाढदिवसाला पवार-ठाकरे गटातून कौतुकाचा वर्षाव! महाराष्ट्रात राजकारणाची समीकरणं बदलतायत का?

Sharad Pawar On Devendra Fadnavis Birthday: शरद पवार म्हणतात – "देवेंद्रांची कामाची गती अफाट", उद्धव ठाकरेंकडूनही राष्ट्रीय स्तरावर जबाबदारी मिळण्याच्या शक्यतेचा उल्लेख

मुंबई :- महाराष्ट्रात पावसाळ्याचं वातावरण असलं तरी राजकारणात "राजकीय ऊष्म्याचं वारे" तापायला सुरुवात झाली आहे. विरोधी बाकांवरून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवणाऱ्या नेत्यांनी अचानक शब्दांची साखरफेक सुरू केली असून, त्यातून नवीन राजकीय समीकरणं तयार होणार का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

तस्वीरें · 1/2

Arrow Keys ⟵ ⟶

शरद पवारांचं आश्चर्यकारक कौतुक
"देवेंद्र फडणवीसांची कामगिरी पाहून आश्चर्य वाटतं. ते थकतच नाहीत!" असं थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जाहीरपणे म्हटल्याने सर्वांनाच धक्का बसला. ‘महाराष्ट्र नायक’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात पवार बोलत होते. कार्यक्षम, मेहनती आणि गतिशील नेते म्हणून त्यांनी फडणवीसांचं भरभरून कौतुक केलं.

उद्धव ठाकरेंचं सौम्य, पण अर्थपूर्ण विधान
ज्यांचं सत्तेसोबत दीर्घकाळ संघर्ष चालू आहे त्या उद्धव ठाकरेंनीही फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. इतकंच नव्हे तर, "त्यांना भविष्यात राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी मिळू शकते," असं विधान करत एक प्रकारे त्यांच्या नेतृत्वक्षमतेला मान्यता दिली.

संजय राऊतांचा अनपेक्षित सूर
ठाकरे गटाचे जहाल प्रवक्ते संजय राऊत यांचाही स्वर या निमित्ताने सौम्य झाला. "मराठी माणसाचं भलं करा, सूडाने वागू नका," अशी सल्लागार शुभेच्छा त्यांनी फडणवीस आणि अजित पवार दोघांनाही दिली. नेहमी आक्रमक टीका करणाऱ्या राऊतांचा हा गोडगोड सूर अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरला आहे.

राजकीय पडसाद आणि चर्चा
सध्याच्या घडीला जेव्हा राजकीय आरोप, शाब्दिक चकमकी आणि वाद पेटलेले आहेत, त्यातच फडणवीसांना विरोधकांकडून मिळालेलं हे "गोड बोलणं" म्हणजे कोणत्या नव्या समीकरणांचा संकेत आहे का, हा चर्चेचा विषय ठरतोय. महाराष्ट्रातील राजकारणाचे वारे खरंच उलट दिशेने वाहतायत का?

शेयर करें