Mumbai News : परवानगी नाकारूनही शिवाजी पार्कवर आंदोलन; CJPच्या पदाधिकाऱ्यांसह ५०० आंदोलकांवर गुन्हा
Mumbai news मुंबई : दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर पोलिसांची पूर्वपरवानगी न घेता आंदोलन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
1 मिनट पठन

Mumbai news मुंबई : दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर पोलिसांची पूर्वपरवानगी न घेता आंदोलन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकरणी कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके, साम्या कोरडे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांवर आणि सुमारे ५०० आंदोलकांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महात्मा गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी हे आंदोलन करण्यात आले होते.https://maharashtramirror.com/ Mumbai news
परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन
मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाच्या कामकाजाच्या निषेधार्थ तसेच मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJPच्या वतीने शिवाजी पार्क मैदानात आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत हे आंदोलन करण्याचे नियोजन करण्यात आले होते.https://maharashtramirror.com/ Mumbai news
मात्र, शिवाजी पार्क परिसर हा शांतता क्षेत्र तसेच रहिवासी भाग असल्याने मुंबई पोलिसांनी आंदोलनाला पूर्वपरवानगी नाकारली होती. त्यानंतरही शेकडो आंदोलक शिवाजी पार्क परिसरात जमा झाले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आंदोलकांनी सार्वजनिक रस्त्यावर सभा घेतली, ध्वनिक्षेपकाचा वापर केला आणि घोषणाबाजी केली.
प्रमुख पदाधिकाऱ्यांवरही गुन्हा
परवानगी नसतानाही आंदोलन केल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजीत दिपके, अजिंक्य शिंदे, प्रणय अहिरे, आशुतोष रांका, सौरभ दास, आफरीन नवाज, सोम्या (साम्या) कोरडे, अंकित भारद्वाज, विजय मळगी आणि योगेश इंगळे यांच्यासह इतर सुमारे ५०० अज्ञात आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे आता या आंदोलनाचे आयोजन, सहभागी आंदोलकांची भूमिका तसेच परवानगी नसतानाही आंदोलन करण्यामागील परिस्थिती याबाबत पुढील तपास सुरू केला आहे.
