मुख्य सामग्री पर जाएँ

Chatrpati Sambhajinager : तिरंगा फडकावणे या देशात पाप झालंय का?; कॉकरोच जनता पार्टीच्या नेत्यांच्या तुरुंगवासावर अभिजीत दीपके यांचा केंद्र सरकारवर संताप!

Chatrpati Sambhajinager : छत्रपती संभाजीनगर :- कॉकरोच जनता पार्टीला (CJP) दिल्ली पोलिसांनी एक मोठा आणि जोरदार दणका दिला आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

तिरंगा फडकावणे या देशात पाप झालंय का?; कॉकरोच जनता पार्टीच्या नेत्यांच्या तुरुंगवासावर अभिजीत दीपके यांचा केंद्र सरकारवर संताप!
तिरंगा फडकावणे या देशात पाप झालंय का?; कॉकरोच जनता पार्टीच्या नेत्यांच्या तुरुंगवासावर अभिजीत दीपके यांचा केंद्र सरकारवर संताप!

Chatrpati Sambhajinager : जंतर-मंतरवर तिरंगा फडकवणे ठरले गुन्हेगार; सौरव दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदेंना पाच दिवसांची न्यायलयीन कोठडी

Chatrpati Sambhajinager : छत्रपती संभाजीनगर :- कॉकरोच जनता पार्टीला (CJP) दिल्ली पोलिसांनी एक मोठा आणि जोरदार दणका दिला आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके दिल्लीबाहेर असताना, पोलिसांनी आशुतोष रांका, सौरव दास आणि अजिंक्य शिंदे या प्रमुख नेत्यांना ताबो्यात घेत मोठी कारवाई केली. जंतर-मंतरच्या प्रतिबंधित क्षेत्रात बेकायदेशीर प्रवेश करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर उभे केल्यानंतर त्यांना थेट पाच दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात पाठवण्यात आले आहे.https://maharashtramirror.com/ Chatrpati Sambhajinager :

तिरंगा फडकावणे या देशात कधीपासून पाप झाले?; मोदी सरकार पोलिसांच्या मागे लपलेय' — अभिजीत दीपके

या कारवाईनंतर कॉकरोच जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर अतिशय घणाघाती हल्लाबोल केला आहे.
थेट आव्हान देताना दीपके म्हणाले की, "जे करायचे आहे ते समोर येऊन करा, अशी लपूनछपून कारवाई करू नका. जंतर-मंतरवर तिरंगा फडकवल्याबद्दल तुम्ही आमच्या नेत्यांना पाच दिवस तुरुंगात टाकत आहात, पण या देशात तिरंगा फडकवणे कधीपासून पाप झाले? सत्तेत बसलेले सगळे लोक भितरे आहेत आणि ते पोलिसांच्या पाठीमागे लपत आहेत.

काल पोलिसांनी सौरव, आशुतोष आणि अजिंक्य यांना ताब्यात घेतले, परंतु त्यांना त्यांच्या वकिलांनाही भेटू दिले नाही, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. नरेंद्र मोदींच्या राजवटीत जर जंतर-मंतरवर तिरंगा फडकवणे गुन्हा ठरत असेल, तर देशात आणीबाणीसारखीच परिस्थिती असल्याचे त्यांनी म्हटले. आपल्या जीवाची पर्वा नाही असे सांगत नागपूर पोलिसांनी दिलेली सुरक्षा आपण आधीच नाकारली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा हेच आमचे अंतिम ध्येय

तुरुंगवासाने किंवा दडपशाहीने आमचा आवाज दाबला जाणार नाही, असा स्पष्ट उच्चार करत अभिजीत दीपके म्हणाले की, आमची एकमेव आणि मुख्य मागणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आहे. ज्ञानेश कुमार हे सत्तेत टिकून राहण्यासाठी पंतप्रधान मोदींना मदत करत असल्याचा आरोप त्यांनी केला. कॉकरोच जनता पार्टी ही पूर्णपणे स्वतंत्र पार्टी असून आम्ही आमचे आंदोलन यापुढेही सुरूच ठेवू, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, आमचे आंदोलन आणि 'इंडिया' (INDIA) आघाडीचे आंदोलन हे एकाच समान मागणीसाठी सुरू असून, आमचा लढा निवडणूक आयोगाच्या विरोधात असल्याचे त्यांनी शेवटी नमूद केले.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेयर करें