मुख्य सामग्री पर जाएँ

Pune Crime : चऱ्होलीत झोपेतून उठवल्याने नातवाने केला आजीचा खून

Pune Crime : पिंपरी: घरात सतत बडबड करून झोपेतून उठविल्याच्या रागातून नातवाने आपल्या ७५ वर्षीय आजीचा डोक्यात तांब्या मारून खून केल्याची धक्कादायक घटना घडली.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

चऱ्होलीत झोपेतून उठवल्याने नातवाने केला आजीचा खून आजीच्या डोक्यात स्टीलचा तांब्या मारून तिला आपटले जमिनीवर
चऱ्होलीत झोपेतून उठवल्याने नातवाने केला आजीचा खून आजीच्या डोक्यात स्टीलचा तांब्या मारून तिला आपटले जमिनीवर

Pune Crime : आजीच्या डोक्यात स्टीलचा तांब्या मारून तिला आपटले जमिनीवर

Pune Crime : पिंपरी: घरात सतत बडबड करून झोपेतून उठविल्याच्या रागातून नातवाने आपल्या ७५ वर्षीय आजीचा डोक्यात तांब्या मारून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना गुरुवारी (१७ सप्टेंबर) सकाळी चऱ्होली येथील पंतप्रधान आवास योजना म्हाडा इमारतीमध्ये घडली.https://maharashtramirror.com/ Pune Crime

माया लक्ष्मण आहिवळे (७५) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी साईनाथ नागनाथ थोरात (५०, रा. चऱ्होली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांचा मुलगा स्वप्नील साईनाथ थोरात (२५, रा. चऱ्होली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/

पोलीस दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साईनाथ यांची सासू माया लक्ष्मण अहिवळे (७५) यांनी साईनाथ यांचा मुलगा स्वप्नील याला घरात घाण केली आणि झोपलेला असताना बडबड करून उठवले, या कारणावरून स्वप्निल याला राग आला. त्या रागातून स्वप्नील याने आजीच्या डोक्यात स्टीलचा तांब्या मारून तिला जमिनीवर आपटले. यात गंभीर दुखापत झाल्याने आजीचा जागीच मृत्यू झाला. दिघी पोलीस तपास करत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेयर करें