मुख्य सामग्री पर जाएँ

Pune Fraud : साकेत प्रदिप शहा या पुण्यातील बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल

भागीदारी व्यवसायात ३६ लाखांचा अपहार केल्याची तक्रार; फसवणूक केल्याचा प्रकार भोसरी येथे उघडकीस

दज
दत्तात्रय जाधव

1 मिनट पठन

investment fraud
investment fraud

भागीदारी व्यवसायात ३६ लाखांचा अपहार केल्याची तक्रार; फसवणूक केल्याचा प्रकार भोसरी येथे उघडकीस


फिर्यादीने संस्थेमध्ये एकूण ८० लाख ४७ हजार ३४९ रुपयांची गुंतवणूक केली होती. आरोपीने त्यापैकी ३६ लाख ९५ हजार ८८० रुपये व्यवसायासाठी न वापरता स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी खर्च केले. फसवणूक लपवण्यासाठी आरोपीने बनावट हिशोब तयार करून फिर्यादीला ईमेलवर पाठवला होता.

पिंपरी, एप्रिल ४, महाराष्ट्र मिरर: बांधकाम व्यवसायात भागीदारी करून गुंतवणूकदाराच्या पैशांचा वैयक्तिक कामासाठी वापर करून फसवणूक केल्याचा प्रकार भोसरी येथे उघडकीस आला आहे. ही घटना १२ फेब्रुवारी २०२४ ते ७ ऑक्टोबर २०२५ दरम्यान इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली.

याप्रकरणी ३३ वर्षीय व्यक्तीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार साकेत प्रदिप शहा (४२), कोंढवा येथील रहिवासी, याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला भागीदारीत बांधकाम व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले होते. फिर्यादीने संस्थेमध्ये एकूण ८० लाख ४७ हजार ३४९ रुपयांची गुंतवणूक केली होती. आरोपीने त्यापैकी ३६ लाख ९५ हजार ८८० रुपये व्यवसायासाठी न वापरता स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी खर्च केले. फसवणूक लपवण्यासाठी आरोपीने बनावट हिशोब तयार करून फिर्यादीला ईमेलवर पाठवला होता. आरोपीने स्वतःची सॅलरी व कमिशन दाखविले. तसेच स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी पैसे खर्च करून फिर्यादी यांच्या पैशांचा अपहार करत त्यांची फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.

real estate developer

A case has been registered against Saket Pradip Shah, a Pune-based real estate developer

शेयर करें