Kothrud Burglary : कोथरूडमध्ये घरफोडी, ५.४९ लाखांची रोकड आणि दागिने चोरीला
Burglary in Kothrud
दज
दत्तात्रय जाधव
1 मिनट पठन

पुणे, ४ एप्रिल, Maharashtra Mirror : कोथरूडमधील डावी भुसारी कॉलनी, धनश्री पार्क येथील एक फ्लॅट फोडून अज्ञात आरोपींनी बेडरूममधून १.९५ लाख रुपयांची रोकड आणि ३.५४ लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. ही घटना नुकतीच घडली आहे.

याप्रकरणी कोथरूड येथील ४८ वर्षीय रहिवाशाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार दगडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. Burglary in Kothrud:
Burglary in Kothrud: Cash and Jewelry Worth ₹5.49 Lakhs Stolen
