Brijbhushan Singh महिला कुस्तीपट्टूंच्यालैंगिक छळ प्रकरणी निर्दोष मुक्त
नवी दिल्ली, महाराष्ट्र मिरर Brijbhushan Singh भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष आणि माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांना महिला कुस्तीपट्टूंच्या लैंगिक छळ प्रकरणात मोठी कायदेशीर दिलासा मिळाला आहे.
2 मिनट पठन

Brijbhushan Singh सबळ पुराव्याअभावी बृजभूषण सिंह आणि विनोद तोमर दोषमुक्त
नवी दिल्ली, महाराष्ट्र मिरर
Brijbhushan Singh भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष आणि माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांना महिला कुस्तीपट्टूंच्या लैंगिक छळ प्रकरणात मोठी कायदेशीर दिलासा मिळाला आहे. दिल्लीच्या राउज अव्हेन्यू कोर्टाने सोमवारी या प्रकरणाचा अंतिम निकाल सुनावत बृजभूषण शरण सिंह आणि सहआरोपी विनोद तोमर या दोघांचीही सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली आहे. brijbhushan singh sexual harassment case

न्यायालयाने स्पष्ट केले की, फिर्यादी पक्ष आणि कुस्तीपट्टूंनी लावलेले आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक असणारे सबळ पुरावे न्यायालयात सादर करता आले नाहीत. Brijbhushan Singh
जानेवारी २०२३ मध्ये देशातील दिग्गज महिला कुस्तीपट्टूंनी दिल्लीतील जंतरमंतरवर जोरदार आंदोलन करत बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले होते. या प्रकरqणानंतर दिल्ली पोलिसांनी कसून चौकशी करत जून २०२३ मध्ये १५०० पानांचे आरोपपत्र (Charge Sheet) न्यायालयात दाखल केले होते.
Crime News : पुण्यात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ; नागरिकांना ३९ लाखांचा गंडा

या प्रकरणात बृजभूषण सिंह यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३५४ (विनभंग), ३५४अ (लैंगिक छळ), ३५४ड (पाठलाग करणे) आणि ५०६ (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच कुस्ती महासंघाचे माजी साहाय्यक सचिव विनोद तोमर यांनाही सहआरोपी बनवण्यात आले होते. यापूर्वी, एका अल्पवयीन कुस्तीपट्टूने लावलेल्या आरोपां संदर्भातील पोक्सो (POCSO) अंतर्गत दाखल झालेला गुन्हा याआधीच कायदेशीर प्रक्रियेत रद्द किंवा बंद करण्यात आला होता.
अखेर Mukunddas Lohiya College वर AICTE ची कारवाई
या वादानंतर राजकारणात उडालेल्या अभूतपूर्व खळबळीमुळे भारतीय जनता पक्षाने (BJP) २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये बृजभूषण शरण सिंह यांचे उत्तर प्रदेशमधील कैसरगंज मतदारसंघातील तिकीट कापले होते. मात्र, त्यांच्या जागी पक्षाने त्यांचे सुपुत्र करण भूषण सिंह यांना उमेदवारी दिली आणि ते या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. गेल्या तीन वर्षांपासून बृजभूषण सिंह या प्रकरणात जामिनावर बाहेर होते. Brijbhushan Singh

कोर्टाचा निकाल समोर आल्यानंतर प्रतिक्रिया देताना माजी खासदार बृजभूषण शरण सिंह म्हणाले, "मी सुरुवातीपासून सांगत होतो की मी निर्दोष आहे आणि जे बोललो ते आज सत्य सिद्ध झाले आहे. तक्रारदारांच्या जबाबात सुरुवातीपासूनच मोठा विरोधाभास होता. आता मी न्यायालयाच्या सविस्तर आदेशाची प्रतीक्षा करत आहे." या निकालानंतर कायदेशीर वर्तुळात आणि राजकीय पातळीवर जोरदार चर्चा सुरू झाली असून, या प्रकरणाला आता पूर्णविराम मिळाला आहे. brij bhushan sharan singh
https://www.instagram.com/maharashtramirrornews?igsh=MTUwMm85OWgwdnY1ZA%3D%3D&utm_source=qr
