मुख्य सामग्री पर जाएँ

Pune News : ब्रिक्सच्या पाहुण्यांना शाकाहारी मेजवानी; डॉ. गंगवाल म्हणतात, ‘हीच भारताची संस्कृती

Pune News :पुणे : दिल्ली येथे झालेल्या ब्रिक्स परिषदेदरम्यान विदेशी पाहुण्यांना भारतीय शाकाहारी भोजनाची मेजवानी देण्यात आल्याने शाकाहाराचे खंदे पुरस्कर्ते आणि ‘सर्व जीव मंगल प्रतिष्ठान’चे संस्थापक डॉ.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

ब्रिक्सच्या पाहुण्यांना शाकाहारी मेजवानी; डॉ. गंगवाल म्हणतात, ‘हीच भारताची संस्कृती !’
ब्रिक्सच्या पाहुण्यांना शाकाहारी मेजवानी; डॉ. गंगवाल म्हणतात, ‘हीच भारताची संस्कृती !’

Pune News :ब्रिक्सच्या पाहुण्यांच्या ताटात भारतीय शाकाहाराचा स्वाद डॉ. कल्याण गंगवाल यांच्याकडून भारतीय खाद्यसंस्कृतीचा गौरव"

Pune News :पुणे : दिल्ली येथे झालेल्या ब्रिक्स परिषदेदरम्यान विदेशी पाहुण्यांना भारतीय शाकाहारी भोजनाची मेजवानी देण्यात आल्याने शाकाहाराचे खंदे पुरस्कर्ते आणि ‘सर्व जीव मंगल प्रतिष्ठान’चे संस्थापक डॉ. कल्याण गंगवाल यांनी समाधान व्यक्त केले. भारतीय खाद्यसंस्कृतीतील समृद्ध शाकाहारी परंपरेचे दर्शन आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर घडवून आणणे ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ब्रिक्स परिषदेदरम्यान आयोजित राजकीय स्नेहभोजनात भारतीय खाद्यपरंपरेतील विविध शाकाहारी पदार्थांचा समावेश करण्यात आला होता. खांडवी मिलेट, खुंब गलौटी, पनीर लबाबदार, गुच्छी मार्मिक, बाजरा पुलाव, चुकंदर रायता, जलेबी आणि शहतूत फिरनी यांसारख्या पदार्थांनी या मेजवानीची शोभा वाढवली. भारतीय तृणधान्ये, स्थानिक धान्ये, भाज्या आणि पारंपरिक पाककलेचा सुरेख मिलाफ या मेनूमधून पाहायला मिळाला.

“शाकाहार हीच भारताची संस्कृती असून, शुद्ध शाकाहारी आहार हा मानवासाठी योग्य आहार आहे. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ मी आणि माझे सहकारी शाकाहार, जीवदया, पर्यावरणसंवर्धन आणि व्यसनमुक्तीसाठी कार्यरत आहोत. या चळवळीमुळे अनेक नागरिकांनी शाकाहाराचा स्वीकार केला आहे,” असे डॉ. गंगवाल यांनी सांगितले.

शाकाहाराच्या प्रचार-प्रसारासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या डॉ. गंगवाल यांच्या मते, भारतातील मोठ्या वर्गाच्या आहारात शाकाहाराला महत्त्वाचे स्थान आहे. विशेषतः सण, उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी शाकाहारी भोजनाला प्राधान्य दिले जाते.

ब्रिक्ससारख्या आंतरराष्ट्रीय परिषदेत भारतीय शाकाहारी व्यंजनांचे सादरीकरण झाल्याने शाकाहाराच्या चळवळीला व्यापक स्वरूप मिळत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. भारताच्या शाकाहारी खाद्यपरंपरेचा गौरव करणे म्हणजे इतरांच्या खाद्यपद्धतींचा अवमान नव्हे, तर देशाच्या सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडविणे होय, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेयर करें