मुख्य सामग्री पर जाएँ

Borivali Accident News : गगनचुंबी इमारतीतील यांत्रिक निष्काळजीपणाचा बळी – कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

Borivali Car Lift Accident News : बोरिवलीत कार लिफ्ट कोसळल्याने एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

व
विवेक

1 मिनट पठन

Borivali Accident News : गगनचुंबी इमारतीतील यांत्रिक निष्काळजीपणाचा बळी – कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

Borivali Car Lift Accident News : बोरिवलीत कार लिफ्ट कोसळल्याने एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

मुंबई (बोरिवली) :- बोरिवली (पश्चिम) परिसरात शनिवारी सकाळी घडलेल्या दुर्घटनेने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 21 मजली ओम प्रथमेश इमारतीतील कार पार्किंगसाठी वापरली जाणारी यांत्रिक लिफ्ट अचानक कोसळल्याने दोन मजुरांचे प्राण धोक्यात आले. यामध्ये शुभम धुरी (30 वय) याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, सुजित यादव (45 वय) गंभीर जखमी झाला आहे. Borivali Car Lift Accident News

सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी घडलेल्या या घटनेनंतर अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने अडकलेल्या दोन्ही मजुरांना बाहेर काढून जवळील शताब्दी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी शुभमला मृत घोषित केले, तर सुजितवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.

या दुर्घटनेमागील नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक तपासात लिफ्टच्या देखभालीत निष्काळजीपणा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई पोलीस आणि अग्निशमन विभाग यावर संयुक्त चौकशी करत असून, बांधकाम व्यावसायिक आणि व्यवस्थापन यांची जबाबदारी ठरवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

शेयर करें