मुख्य सामग्री पर जाएँ

पुण्यासह महाराष्ट्रातील २४ शहरांमधील ४० विक्रेत्यांकडे सवलतीच्या दरात ग्रंथोत्सव

१ मे पासून महाराष्ट्रातील २४ शहरांमध्ये ‘दिलीपराज‌’ ग्रंथोत्सव; ३०० पेक्षा अधिक पुस्तकांवर सवलत

पघ
प्रशिक घस्ते

1 मिनट पठन

पुण्यासह महाराष्ट्रातील २४ शहरांमधील ४० विक्रेत्यांकडे सवलतीच्या दरात ग्रंथोत्सव

१ मे पासून महाराष्ट्रातील २४ शहरांमध्ये ‘दिलीपराज‌’ ग्रंथोत्सव; ३०० पेक्षा अधिक पुस्तकांवर सवलत

निलेश राऊत
पुणे: महाराष्ट्रातील आघाडीची प्रकाशन संस्था दिलीपराज प्रकाशनतर्फे ग्रंथप्रेमींसाठी ‌‘दिलीपराज ग्रंथोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. दि. १ मे ते १५ जून २०२६ या कालावधीत पुण्यासह महाराष्ट्रातील २४ शहरांमधील प्रमुख ४० विक्रेत्यांकडे हा महोत्सव भरविण्यात येणार आहे. ग्रंथोत्सवाचे यंदाचे दुसरे वर्ष आहे.

महोत्सवात दिलीपराज प्रकाशनाची निवडक तीनशेहून अधिक पुस्तके ३५ टक्केपर्यंत सवलतीत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. साहित्य, इतिहास, कथा, कादंबरी, माहितीपर, राजकीय, विज्ञान, बालसाहित्य आणि इतर अनेक विषयांवरील पुस्तकांचा समावेश असणार आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील नामांकित ग्रंथ विक्रेत्यांकडे एकाच वेळी विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

पुणे, मुंबई, पनवेल, ठाणे, दादर, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती, कराड, ठाणे, संभाजीनगर, नाशिक, जळगाव, धुळे, सांगली, चिपळूण, सातारा, लातूर, अलिबाग, पालघर, अमरावती, नागपूर, बीड येथील प्रमुख विक्रेत्यांकडे दिलीपराज प्रकाशनची पुस्तके उपलब्ध असणार आहेत. पुण्यातील रसिक साहित्य, पाटील एन्टरप्रायजेस, पुस्तक पेठ, पुस्तक विश्व यांच्याकडे पुस्तके मिळणार आहेत.

केंद्र सरकारकडून मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा, वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे, वाचन संस्कृती टिकून रहावी, जास्तीत जास्त लोकांपर्यंत दर्जेदार पुस्तके पोहोचावीत, मराठी भाषेचा प्रचार-प्रसार व्हावा या उद्देशाने महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. ग्रंथखरेदीत ३५ टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार असल्याने ‌‘दिलीपराज ग्रंथोत्सव २०२६‌’ पुस्तकप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे, असे दिलीपराज प्रकाशनचे संचालक मधुर बर्वे यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.

Book festival at discounted prices from 40 vendors in 24 cities of Maharashtra including Pune

शेयर करें