मुख्य सामग्री पर जाएँ

भाजप नगरसेवकांनीच गृहविभाग, पोलीस प्रशासनाची प्रतिमा केली मलिन

नगरसदस्यांनी स्वतःची प्रसिद्धी व्हावी म्हणून जाहीर वक्तव्य केले

पघ
प्रशिक घस्ते

1 मिनट पठन

भाजप नगरसेवकांनीच गृहविभाग, पोलीस प्रशासनाची प्रतिमा केली मलिन

नगरसदस्यांनी स्वतःची प्रसिद्धी व्हावी म्हणून जाहीर वक्तव्य केले

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपच्या काळेवाडी भागातील सदस्यांनी त्याच भागातील एका चिमुरडीवर झालेल्या अत्याचारामध्ये पोलिसांनी अयोग्य वागणूक दिल्याचे सांगत संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती. मात्र, घटना घडल्यानंतर पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली होती. तसेच नगरसदस्यानी केलेले आरोप चुकीचे आणि गृहविभाग, पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन करण्यासाठी केले. त्याच बरोबर स्वतःची प्रसिद्धी व्हावी म्हणून जाहीर वक्तव्य केल्याचे आता प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

नसरापूर येथील घटनेचा निषेध नोंदविताना सर्वसाधारण सभेत महापौरांसमोर हा सगळा प्रकार घडला आहे.

शेयर करें