Sawantwadi News : भाजपच्या १३ निलंबित पदाधिकाऱ्यांचे निलंबन अखेर मागे
Sawantwadi News : सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या काळात पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी केल्यासह पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या भाजपच्या १३ पदाधिकाऱ्यांचे निलंबन अखेर मागे घेण्यात आले आहे.
1 मिनट पठन

Sawantwadi News : पक्षशिस्तभंग आणि बंडखोरीप्रकरणी झाली होती कारवाई शिस्तभंग समितीच्या शिफारशीनंतर निर्णय
Sawantwadi News : सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या काळात पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी केल्यासह पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या भाजपच्या १३ पदाधिकाऱ्यांचे निलंबन अखेर मागे घेण्यात आले आहे. निलंबन मागे घेण्यात आलेल्यांमध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचाही समावेश आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.https://maharashtramirror.com/ Sawantwadi News
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी पक्षशिस्तीच्या विरोधात जाऊन काम केल्याने त्यांच्यावर पक्षीय पातळीवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर काही कालावधीनंतर संबंधित पदाधिकाऱ्यांनी आपली चूक लक्षात आल्याचे नमूद करत निलंबन रद्द करण्याची मागणी करणारे अधिकृत विनंती अर्ज पक्षाकडे सादर केले होते.या अर्जांची पक्षाने दखल घेत प्रमुख पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर शिस्तभंग समितीने केलेल्या शिफारशीनुसार संबंधित सर्व १३ पदाधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.https://maharashtramirror.com/ Sawantwadi News
या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी निलंबन मागे घेण्यात आलेले सर्व पदाधिकारी पुन्हा सक्रियपणे पक्षाच्या कामात सहभागी होतील, असा विश्वास जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला आहे.
निलंबन मागे घेण्यात आलेले पदाधिकारी
नितीन एकनाथ राऊळ — जिल्हा परिषद, इन्सुली मतदारसंघ
मायकल फ्रान्सिस डिसोजा — जिल्हा परिषद, कोलगाव
सुजाता अजित पडवळ — जिल्हा परिषद, तुळस
जितेंद्र पांडुरंग गावकर — पंचायत समिती, माजगाव
शर्वाणी शेखर गावकर — माजी जिल्हा परिषद सभापती
स्वागत रघुवीर नाटेकर — भाजपचे माजी बांदा मंडल अध्यक्ष
योगेश अशोक केणी
उल्हास उत्तम परब
स्नेहल संदीप नेमळेकर
साक्षी संदीप नाईक
सुप्रिया शैलेश नाईक
प्रवीण नारायण गवस
अनिरुद्ध फाटक
