Big Breaking News | सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार
गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईत संशयिताकडून मोठ्या प्रमाणावर विषारी कॅप्सुल्सचा साठा जप्त करण्यात आला.
1 मिनट पठन

महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणावर जीवितहानी घडवून आणण्याचा कथित कट सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावला आहे. कारवाईदरम्यान विषारी पदार्थाने भरलेल्या तब्बल १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त करण्यात आल्या असून, या प्रकरणी फय्याज प्रेमजी याला ताब्यात घेण्यात आले आहे. तो मूळचा प…

गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईत संशयिताकडून मोठ्या प्रमाणावर विषारी कॅप्सुल्सचा साठा जप्त करण्यात आला. प्राथमिक तपासात या कॅप्सुल्सचा वापर मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान सामूहिक विषप्रयोग करण्यासाठी केला जाणार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या कॅप्सुल्समधील पदार्थाचे स्वरूप निश्चित करण्यासाठी नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. Big Breaking News |
तपास यंत्रणांनी फय्याज प्रेमजी याची कसून चौकशी सुरू केली असून, त्याचे इतर कोणाशी संबंध आहेत का, या कटामागे आणखी कोणी सहभागी आहे का, तसेच विषारी कॅप्सुल्सचा पुरवठा कोठून झाला, याचा शोध घेतला जात आहे. आरोपीच्या मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि आर्थिक व्यवहारांचीही तपासणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, या घटनेनंतर मोहरमच्या मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
