मुख्य सामग्री पर जाएँ

Pune News : तरुणाचे बँक खाते हॅक करून ऑनलाइन पद्धतीने १ लाख उकळले

Pune News पिंपरी, महाराष्ट्र मिरर: एका तरुणाचे बँक खाते हॅक करून ऑनलाइन पद्धतीने १ लाख ३ हजार ५८२ पैसे काढून घेण्याची घटना भुकुम येथे घडली आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

तरुणाचे बँक खाते हॅक करून ऑनलाइन पद्धतीने १ लाख ३ हजार ५८२ पैसे उकळले
तरुणाचे बँक खाते हॅक करून ऑनलाइन पद्धतीने १ लाख ३ हजार ५८२ पैसे उकळले

Pune News पिंपरी, महाराष्ट्र मिरर: एका तरुणाचे बँक खाते हॅक करून ऑनलाइन पद्धतीने १ लाख ३ हजार ५८२ पैसे काढून घेण्याची घटना भुकुम येथे घडली आहे. याप्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात परप्रांतिय दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

अशोककुमार निंबाराम जाखड (वय २५), अर्जुन हिरामन अहलावत (वय २१, दोघे रा. जोधपूर, राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. किशोर गणपत सुर्यवंशी (वय २५, भुकुम, मुळ रा. सोयगाव, छत्रपती संभाजीनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली.https://maharashtramirror.com/ Pune News

फिर्यादी रूमवर असताना ८ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांच्या महाराष्ट्र ग्रामीण बँक खात्यातून ९३ हजार रुपये आणि एचडीएफसी खात्यातून १० हजार ५८२ रुपये असे एकूण १ लाख ३ हजार ५८२ रुपये दुसऱ्या खात्यावर ट्रान्सफर झाल्याचे मेसेज आले. बँक खात्यांचा अनधिकृत ऑनलाईन ॲक्सेस मिळवून ही फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बावधन पोलीस तपास करत आहेत.

शेयर करें