Pimpri News : भोसरीतील गावजत्रा मैदानात कोयत्यासह फिरणाऱ्या तरुणास अटक
Pimpri News :पिंपरी: प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग करून मोकळ्या मैदानात विनापरवाना कोयता घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
1 मिनट पठन

Pimpri News : सापळा लावून संशयित तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात
Pimpri News :पिंपरी: प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग करून मोकळ्या मैदानात विनापरवाना कोयता घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी (२९ सप्टेंबर) दुपारी ३.२० वाजण्याच्या सुमारास गावजत्रा मैदान, भोसरी येथे करण्यात आली.https://maharashtramirror.com/ Pimpri News
युवी करण परिहार (२३, रा. मोशी; मूळ रा. कैलाली, नेपाळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस कॉन्स्टेबल वैभव वाटकर यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भोसरी येथील गावजत्रा मैदानावर एक तरुण कोयता घेऊन फिरत असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. Pimpri News https://maharashtramirror.com/
त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन संशयित तरुणाला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे कोयता आढळून आला. पोलिसांनी कोयता जप्त केला. आरोपी युवी हा मूळचा नेपाळ येथील असून तो कामाच्या शोधात पिंपरी चिंचवड शहरात आला असल्याची माहिती समोर आली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
