भिवंडी : तांब्याच्या तारांची चोरी दोन जणांना अटक
Bhiwandi Police Arrested Copper Robbers : पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.
2 मिनट पठन

Bhiwandi Police Arrested Copper Robbers : पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी तांब्याच्या तारा चोरी केल्याचे समोर आले. तांब्याची तारेची विक्री करण्यासाठी आले असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे
भिवंडी :- तांब्याचे तार विक्रीसाठी आलेल्या दोघांना भिवंडी पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-2 Bhiwandi Crime Branch Unit 2 यांनी अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून हे दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपींकडून तब्बल 21 लाख 45 हजार रुपये किंमतीचा तांब्याचा माल हस्तगत केले आहे. लतीफ आरिफ खान (31 वय ,रा. कर्नाटक राज्य) संगप्पा नंदप्पा सिरमकोल (44 वय रा. कर्नाटक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा कक्ष-2 चे पोलीस पथक परिमंडळ 2 भिवंडी येथे गस्त घालत असताना गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार शशिकांत यादव यांना बातमी मिळाली होती की, रेकॉर्डवरील गुन्हेगार हे चोरी केलेल्या तांब्याच्या मालाचे विक्री करण्यासाठी क्विक बाईट हॉटेलच्या समोर येईल कल्याणकडून भिवंडीकडे जाणाऱ्या मार्गावर एका टेम्पो सह उभे असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून दोन आरोपींना तांब्याच्या माल टेम्पोसह ताब्यात घेतले आहे. जवळपास 21 लाख 45 हजार किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या दोन्ही आरोपींवर नारपोली पोलीस ठाण्याच्या Narpoli Police Station हद्दीतील 3 आणि पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच फरार आरोपी अमन खान याच्या मदतीने ही चोरी केल्याचे पोलिसांच्या तपासात माहिती समोर आली असून पोलीस तिसरा आरोपी अमन खान याचा शोध घेत आहे.
पोलीस पथक
अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे ठाणे शहर,शेखर बागडे सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शोध-1, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-2 भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधाकर चौधरी, पोलीस हवालदार शशिकांत यादव, वामन भोईर, सचिन जाधव,सुनिल सांळुखे, प्रकाश पाटील, साबिर शेख, पोलीस शिपाई उमेश ठाकुर, अमोल इंगळे, विजय कुंभार, नितीन बैसाणे यांनी केलेली आहे.
- #Thane Crime News
- #भिवंडी अपराध समाचार
- #Maharashtra News
- #thane police latest news
- #Narpoli Police station
- #Thane News
- #मुंबई अपराध समाचार
- #Copper Robbers Arrested In Bhiwandi
- #मराठी समाचार
- #Tamilnadi Copper Robbers Arrested In Bhiwandi
- #ठाणे ब्रेकिंग न्यूज़
- #Bhiwandi Crime Branch Unit 2
- #महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज़
