Bhaskar Jadhav : "अध्यक्ष परंपरा पायदळी तुडवतायत" म्हणणारे जाधव आज म्हणाले – माझ्याकडून चूक झाली
•हातवारे, संताप, आरोप… आणि अखेर मोठ्या मनाने केलेली माफी सभागृहानेही स्वीकारली
1 मिनट पठन

•हातवारे, संताप, आरोप… आणि अखेर मोठ्या मनाने केलेली माफी सभागृहानेही स्वीकारली
मुंबई | कालच्या वादळानंतर आज विधानसभेच्या कार्यवाहीत थोडा शांतीचा सूर उमटला. विरोधी पक्ष नेते आणि ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात अध्यक्षांवर केलेल्या आरोपांबाबत आज थेट माफी मागितली.
काल गुरुवारी जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांवर सभागृहाच्या परंपरा धुळीला मिळवण्याचा गंभीर आरोप केला होता. अध्यक्षांनी सरकारला वाचवण्याचं काम करत असल्याचा ठपका त्यांनी लावला होता. यामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ झाला होता.
"माझ्याकडून शब्द नको तसे गेले, शिक्षा द्यायची असेल तर निःसंकोच द्या!"
आजच्या अधिवेशनात जाधव म्हणाले,“अध्यक्ष महोदय, माझ्याकडून माध्यमांसमोर आणि सभागृहात जे शब्द गेले, त्याबद्दल मी माफी मागतो. हवी ती शिक्षा तुम्ही द्या, मी ती मान्य करतो.”त्यांनी आपल्या हातवाऱ्यांचे आणि संतापाच्या भाषेचेही स्पष्टीकरण दिलं आणि सर्वस्वी जबाबदारी घेतली.
कालचा वाद: अध्यक्षांना प्रश्न नाकारल्यावर संतप्त जाधवांचं आक्रमक रूप
काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उत्तरानंतर जाधवांनी 'राइट टू रिप्लाय'ची मागणी केली होती. मात्र अध्यक्षांनी ती नाकारली. त्यावरून जाधव संतप्त झाले व हातवारे करत, आक्रमक भाषेत प्रतिक्रिया दिली. त्यामुळे शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार वेलमध्ये उतरले, आणि प्रचंड गोंधळ निर्माण झाला.
हेही वाचा: Raj Thackeray : “ही महाराष्ट्राची अवस्था आहे का?” – विधानभवनातील हाणामारीवर राज ठाकरेंचा संताप
