Pimpari News : दहीहंडीत विनापरवाना डीजे; तीन मंडळांवर गुन्हे
Pimpari News : पिंपरी, महाराष्ट्र मिरर : दहीहंडी उत्सवादरम्यान विनापरवाना ध्वनिक्षेपक आणि डीजे यंत्रणा मोठ्या आवाजात वाजवून ध्वनीमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी बावधन पोलिसांनी मुळशी तालुक्यातील तीन मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
1 मिनट पठन

Pimpari News : लवळे, म्हाळुंगे आणि भूगावमध्ये बावधन पोलिसांची कारवाई ; वाहतूक ठप्प करून सार्वजनिक उपद्रव केल्याचाही ठपका
Pimpari News : पिंपरी, महाराष्ट्र मिरर : दहीहंडी उत्सवादरम्यान विनापरवाना ध्वनिक्षेपक आणि डीजे यंत्रणा मोठ्या आवाजात वाजवून ध्वनीमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी बावधन पोलिसांनी मुळशी तालुक्यातील तीन मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. लवळे, म्हाळुंगे आणि भुगाव येथे ६ सप्टेंबरच्या रात्री ही कारवाई करण्यात आली. मोठ्या आवाजातील ध्वनिक्षेपकांमुळे सार्वजनिक उपद्रव निर्माण करण्यासह वाहतुकीला अडथळा निर्माण करून ती ठप्प केल्याचा ठपकाही पोलिसांनी ठेवला आहे. https://maharashtramirror.com/ Pimpari news
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी (६ सप्टेंबर) रात्री दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपकांच्या आवाजावर मर्यादा असतानाही काही मंडळांकडून विनापरवाना प्रतिबंधित ध्वनिक्षेपक आणि डीजे यंत्रणेचा वापर करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.https://maharashtramirror.com/ Pimpari News
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, संबंधित मंडळांनी मोठ्या आवाजात साउंड सिस्टिम वाजवून निर्धारित ध्वनीमर्यादा ओलांडली. पोलिसांनी दिलेल्या आदेशांचे उल्लंघन करण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आणि काही ठिकाणी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.https://maharashtramirror.com/ Pimpari News
या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात अखिल लवळे गाव दहीहंडी उत्सव मंडळ, लवळे; सूर्यमुखी गणेश मंडळ, म्हाळुंगे आणि बाल मित्र मंडळ, माताळवाडी फाटा, भूगाव या तीन मंडळांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३, २७० आणि २९३ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.https://maharashtramirror.com/ Pimpari News
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह-पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक परवेज शिकलगार यांच्यासह बावधन पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.
कडक कारवाईचा इशारा
दरम्यान, बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत यापुढेही विनापरवाना ध्वनिक्षेपक, साउंड सिस्टिम अथवा डीजे यंत्रणेचा वापर करून निर्धारित मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव यांनी दिला आहे.
