Baramati News : पाच लाखांच्या खंडणीसाठी व्यावसायिकावर कोयत्याने हल्ला
Baramati News : पुणे, महाराष्ट्र मिरर : पाण्याचा व्यवसाय सुरू ठेवायचा असेल तर पाच लाख रुपये दे, अशी धमकी देत व्यावसायिकाला कोयते आणि लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना बारामतीत घडली.
1 मिनट पठन

Baramati News : बारामतीत ११ जणांच्या टोळक्याची मारहाण; दोन तोळ्यांची सोनसाखळी हिसकावली, जीवे मारण्याची धमकी
Baramati News : पुणे, महाराष्ट्र मिरर : पाण्याचा व्यवसाय सुरू ठेवायचा असेल तर पाच लाख रुपये दे, अशी धमकी देत व्यावसायिकाला कोयते आणि लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना बारामतीत घडली. या हल्ल्यात संबंधित व्यावसायिकाच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोनसाखळीही हिसकावून नेण्यात आली.https://maharashtramirror.com/ Baramati News
या प्रकरणी आकाश बाळू शेरे (वय २६, रा. जळोची, ता. बारामती, जि. पुणे) यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून,अनोळखी ११ ते १२ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना २४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री दहाच्या सुमारास माळावरची देवी येथून बारामतीकडे जाणाऱ्या पुलावर घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश शेरे हे त्यांचा मित्र सौरभ बुधावले याच्यासोबत जात असताना युनिकॉर्न मोटारसायकलवरील तिघांनी त्यांना रस्त्यात अडवले. त्यानंतर स्कूटीवरील तिघे आणि टोयोटा इनोव्हा क्रिस्टा गाडीतील पाच ते सहा जण तेथे आले. या टोळक्याने तीन कोयते आणि चार लोखंडी रॉडने शेरे यांना मारहाण केली.
मारहाणीदरम्यान स्कूटीवरील एका व्यक्तीने शेरे यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोनसाखळी हिसकावून घेतली. तसेच, पाण्याचा व्यवसाय सुरू ठेवायचा असेल तर पाच लाख रुपये द्यावे लागतील, अशी धमकी दिली. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देऊन हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक इंगवले पुढील तपास करीत आहेत.
