मुख्य सामग्री पर जाएँ

Pune Crime : बारामती, आंबेगाव तालुक्यात घरफोड्या व चोरीच्या घटनांचे सत्र

पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीतील बारामती आणि आंबेगाव तालुक्यात बंद घरे, मोकळ्या जागा आणि मंदिरांच्या परिसराला लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांच्या ऐवजावर हात साफ केला आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

2 मिनट पठन

बारामती, आंबेगाव तालुक्यात घरफोड्या व चोरीच्या घटनांचे सत्र लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास; अद्याप चोरटे मोकाटच
बारामती, आंबेगाव तालुक्यात घरफोड्या व चोरीच्या घटनांचे सत्र लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास; अद्याप चोरटे मोकाटच

Pune Crime : लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास; अद्याप चोरटे मोकाटच

पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीतील बारामती आणि आंबेगाव तालुक्यात बंद घरे, मोकळ्या जागा आणि मंदिरांच्या परिसराला लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांच्या ऐवजावर हात साफ केला आहे. बारामती तालुका, बारामती शहर, घोडेगाव आणि मंचर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडी आणि चोरीच्या चार वेगवेगळ्या घटना समोर आल्या असून, पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News

१.८९ लाखांची घरफोडी


बारामती तालुक्यातील जळोची येथील 'विश्व चैतन्य विंग' (फ्लॅट क्र. १०१) येथे १३ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट २०२६ दरम्यान घरफोडीची घटना घडली. फिर्यादी पूजा राहुल पारसे (वय २३) घर बंद ठेवून गेलेल्या असताना, अज्ञात चोरट्याने उघड्या दरवाजातून किंवा कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्याने घरातील सॅकमध्ये ठेवलेली १ लाख रुपयांची रोकड आणि ८९ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने (ज्यात सोन्याचे गंठण, कानातील टॉप्स, नथ, बदाम, अंगठी व चांदीची मासळी) असा एकूण १.८९ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला.या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला पोलीस हवालदार सोनवणे तपास करत आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News

कुलूप तोडून १.३५ लाखांचा माल लांबवला


बारामती शहरातील कसबा रोड, अंकुर सिटी रो हाऊस येथे ३१ ऑगस्टच्या सायंकाळी ते १ सप्टेंबरच्या सकाळी अकराच्या दरम्यान घरफोडी झाली. फिर्यादी अजय शिवाजी राऊत (वय ३२) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील सोन्याची साखळी, सोन्याचे मणी, कानातील टॉप्स, चांदीचे दागिने आणि १०,००० रुपयांची रोकड असा एकूण १,३५,००० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी बारामती शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगवले पुढील तपास करत आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News

घोडेगावात १.३३ लाखांची रोकड व दागिने लंपास


घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील हरिश्चंद्र मंदिरासमोर १ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास आरती शरद मते (वय २२, रा. कोळवाडी) यांची पर्स अज्ञात चोरट्याने लबाडीने लंपास केली. पर्समध्ये सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे पान, चांदीच्या पट्ट्या आणि भारतीय किरण सुत्रावे यांच्या पर्समधील २०,३०० रुपयांची रोकड असा एकूण १,३३,९०० रुपयांचा ऐवज होता.घोडेगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार वाघ तपास करत आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News

लांडेवाडीत बंद घर फोडून १.५० लाखांचे दागिने चोरीला


मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथील 'महाराजा निवास' या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. २३ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२६ च्या पहाटेच्या सुमारास सौ. कमल बाळू काळे (सध्या रा. चेंबूर, मुंबई) यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी घरातील सोन्याची चेन, सोन्याचे मिनी गंठण आणि चांदीची लक्ष्मीची मूर्ती चोरून नेली. मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक यादव अधिक तपास करत आहेत.

शेयर करें