मुख्य सामग्री पर जाएँ

बलुचिस्तानमध्ये १८ बंडखोरांसह २१ ठार

स्फोटकांनी भरलेल्या ट्रकचा स्फोट

म
मुबारक

1 मिनट पठन

बलुचिस्तानमध्ये १८ बंडखोरांसह २१ ठार

स्फोटकांनी भरलेल्या ट्रकचा स्फोट

  • कराची, वृत्तसंस्था : पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान प्रांतात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईदरम्यान ट्रकमध्ये झालेला भीषण स्फोट आणि त्यानंतर झालेल्या चकमकीत १८ बंडखोरांसह २१ जण ठार झाल्याची माहिती पाकिस्तानी लष्कराने दिली.

    बलुचिस्तानमध्ये १८ बंडखोरांसह २१ ठार; स्फोटकांनी भरलेल्या ट्रकचा भीषण स्फोट

    पाकिस्तानच्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, बलुचिस्तानमधील सोहराब भागात सुरक्षा दलांना संशयास्पद हालचाली आढळल्या. बंडखोरांचा एक गट एका ट्रकमध्ये स्फोटके भरत होता. त्याचदरम्यान ट्रकमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटात आठ बंडखोर आणि तीन नागरिकांचा मृत्यू झाला. स्फोटानंतर घटनास्थळावरून काही बंडखोरांनी पळ काढला. त्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली. या मोहिमेदरम्यान सुरक्षा दल आणि बंडखोरांमध्ये गोळीबार झाला. चकमकीत आणखी १० बंडखोर ठार झाले. या कारवाईदरम्यान दोन सैनिक जखमी झाले. स्फोट आणि त्यानंतर झालेल्या चकमकीतील मृतांची संख्या मिळून २१ झाली आहे. यामध्ये १८ दहशतवादी आणि तीन नागरिकांचा समावेश असल्याचे पाकिस्तानी लष्कराकडून सांगण्यात आले आहे.

    बलुचिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा दलांकडून बंडखोरविरोधी मोहिमा तीव्र करण्यात आल्या आहेत. चार दिवसांपूर्वी प्रांतात करण्यात आलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये २० दहशतवादी मारले गेले होते. त्यापाठोपाठ बुधवारी सोहराब परिसरात झालेल्या कारवाईत १८ दहशतवादी ठार झाल्याचा दावा करण्यात आल्याने बलुचिस्तानमधील सुरक्षा परिस्थिती पुन्हा चर्चेत आली आहे.

    https://studio.youtube.com

    शेयर करें