मुख्य सामग्री पर जाएँ

Aundh District Hospital ICU : औंध जिल्हा रुग्णालयातील ५० खाटांच्या ICU चे महागडे साहित्य गेले कुठे?

पुणे, महाराष्ट्र मिरर : Aundh District Hospital ICU : कोरोनाकाळात रुग्णांना अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी औंध जिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या ५० खाटांच्या अतिदक्षता विभागातील (ICU) महागड्या वैद्यकीय उपकरणांच्या उपलब्धतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

म
मुबारक

2 मिनट पठन

Aundh District Hospital ICU : औंध जिल्हा रुग्णालयातील ५० खाटांच्या ICU चे महागडे साहित्य गेले कुठे?
Aundh District Hospital ICU : औंध जिल्हा रुग्णालयातील ५० खाटांच्या ICU चे महागडे साहित्य गेले कुठे?

कोरोनाकाळात कोट्यवधींचा खर्च; आरोग्य विभागाकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश, सात दिवसांत अहवाल मागविला

पुणे, महाराष्ट्र मिरर : Aundh District Hospital ICU : कोरोनाकाळात रुग्णांना अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी औंध जिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या ५० खाटांच्या अतिदक्षता विभागातील (ICU) महागड्या वैद्यकीय उपकरणांच्या उपलब्धतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या आयसीयूसाठी सार्वजनिक निधीतून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी खरेदी करण्यात आलेल्या काही महागड्या उपकरणांचा ठावठिकाणा लागत नसल्याचे समोर आल्यानंतर आरोग्य विभागाने या संपूर्ण प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. (Aundh District Hospital ICU) Maharashtra Mirror

औंध येथील जिल्हा रुग्णालयाची क्षमता सुमारे ३०० खाटांची असून, रुग्णालयात मूळतः १२ खाटांचा अतिदक्षता विभाग मंजूर होता. मात्र, कोरोना महामारीच्या काळात गंभीर रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शासनाकडून स्वतंत्र आधुनिक ५० खाटांचा आयसीयू उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे आणि अन्य सुविधा उभारण्यात आल्या होत्या. आता याच आयसीयूमधील साहित्य आणि त्यावर झालेल्या खर्चाचा हिशेब तपासणीच्या केंद्रस्थानी आला आहे.

Aundh District Hospital ICU : औंध जिल्हा रुग्णालयातील ५० खाटांच्या ICU चे महागडे साहित्य गेले कुठे?

या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे परिमंडळाचे आरोग्य उपसंचालक यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडून सविस्तर अहवाल मागविला आहे. संबंधित आयसीयूसाठी नेमका किती निधी खर्च करण्यात आला, कोणकोणती उपकरणे खरेदी करण्यात आली, त्यापैकी सध्या किती उपकरणे रुग्णालयात उपलब्ध आहेत आणि उर्वरित उपकरणे नेमकी कुठे आहेत, याची तपासणी होणार आहे. सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे वृत्त आहे.

विशेष म्हणजे, या ५० खाटांच्या आयसीयूच्या वापराबाबत यापूर्वीही प्रश्न निर्माण झाले होते. ऑगस्ट २०२४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मनुष्यबळ आणि डॉक्टरांच्या कमतरतेमुळे हा आयसीयू वर्षभराहून अधिक काळ बंद होता. त्यावेळी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने कोरोना काळात सुरू केलेला ५० खाटांचा आयसीयू बंद करावा लागल्याचे सांगितले होते. काही खाटांचा वापर डायलिसिस केंद्रात, तर काहींचा अन्य आयसीयूमध्ये करण्यात आल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. Aundh District Hospital ICU :

आता मात्र प्रश्न केवळ आयसीयू सुरू किंवा बंद असण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. कोरोनाकाळात सार्वजनिक पैशातून खरेदी केलेल्या वैद्यकीय साहित्याची मूळ यादी काय होती, प्रत्येक उपकरणाची किंमत किती होती, त्याची नोंद स्टॉक रजिस्टरमध्ये आहे का, उपकरणे अन्यत्र हलविण्यात आली असतील तर त्यासाठी अधिकृत आदेश आहेत का आणि सध्या प्रत्यक्षात किती साहित्य उपलब्ध आहे, या सर्व बाबींची चौकशी होणे महत्त्वाचे ठरणार आहे. Aundh District Hospital ICU :

चौकशीत या प्रश्नांची उत्तरे मिळणार का?

कोरोनाकाळात ५० खाटांच्या आयसीयूसाठी एकूण किती निधी मंजूर झाला आणि प्रत्यक्षात किती खर्च झाला? कोणत्या एजन्सी अथवा पुरवठादारांकडून उपकरणे खरेदी करण्यात आली? खरेदी केलेल्या उपकरणांची संपूर्ण यादी आणि सध्याच्या स्टॉक रजिस्टरमधील नोंदी जुळतात का? उपकरणे दुसऱ्या रुग्णालयात अथवा विभागात हस्तांतरित करण्यात आली असतील तर त्याचे अधिकृत दस्तऐवज आहेत का? उपकरणे खरोखरच गायब असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास त्याची जबाबदारी कोणावर निश्चित होणार आणि सार्वजनिक निधीच्या नुकसानीप्रकरणी कारवाई होणार का? या प्रश्नांची उत्तरे सात दिवसांत सादर होणाऱ्या चौकशी अहवालातून समोर येण्याची अपेक्षा आहे.

Maharashtra Mirror News : एअर फोर्सचा जवान असल्याचे भासवून वर्दी शिवायला गेला; टेलरच्या संशयामुळे तोतया जवानाचा पर्दाफाश

हेही वाचा: PMC Road News : भाजपच्या लोकप्रतिनिधींनी पंचवीस कोटींच्या रस्ते कामांच्या निविदा वाटून घेतल्या

शेयर करें