मुख्य सामग्री पर जाएँ

ATM Fraud : सावधान! ATM कार्ड अडकलेय? शिवडी पोलिसांनी उघडकीला आणले आंतरराज्यीय फसवणूक रॅकेट; बिहार-झारखंडमधून 3 आरोपी गजाआड

Mumbai Latest ATM Fraud News : मशिना हॉस्पिटलला पाठवून फिर्यादीची दिशाभूल; ट्रॅव्हल बॅग, शूज आणि ड्रायफ्रूट्सची केली खरेदी, शिवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

व
विवेक

2 मिनट पठन

Mumbai Crime News: Dating scam! Female doctor sexually harassed, forced to have an abortion

Mumbai Latest ATM Fraud News : मशिना हॉस्पिटलला पाठवून फिर्यादीची दिशाभूल; ट्रॅव्हल बॅग, शूज आणि ड्रायफ्रूट्सची केली खरेदी, शिवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

मुंबई :- एटीएम मशीनमध्ये कार्ड अडकल्याचा बनाव रचून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका सराईत आंतरराज्यीय टोळीचा शिवडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीने फिर्यादीच्या बँक खात्यातून तब्बल 89,797 रुपये लंपास केले होते. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी बिहार आणि झारखंडमधून 3 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. Mumbai Latest Fraud News

नेमकी घटना काय?

24 डिसेंबर 2025 रोजी शिवडी येथील दारूखाना परिसरात असलेल्या ॲक्सिस बँकेच्या एटीएममधून पैसे काढताना फिर्यादी आलम लियाकत अली खान यांचे कार्ड मशीनमध्ये अडकले. त्यांनी तिथेच असलेल्या एका हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, तो क्रमांक बनावट होता. पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने त्यांना कार्ड काढण्यासाठी एक कर्मचारी मसिना हॉस्पिटल (भायखला) येथे असल्याचे सांगून तिथे पाठवले. फिर्यादी तिथे गेले असता कोणीही भेटले नाही आणि पुन्हा फोन केल्यावर कर्मचारी उपलब्ध नसल्याचे सांगून त्यांची बोळवण करण्यात आली.

दुसऱ्या दिवशी कार्ड ब्लॉक करून नवीन कार्ड घेतल्यावर फिर्यादीला धक्काच बसला. त्यांच्या खात्यातून 8 वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे 89,797 रुपये काढले गेले होते.

तपासात धक्कादायक खुलासे

शिवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहित खोत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणातून समोर आले की, आरोपींनी केवळ रोख रक्कमच काढली नाही, तर फिर्यादीच्या कार्डचा वापर करून ट्रॅव्हल बॅग, शूज आणि ड्रायफ्रूट्स अशा महागड्या वस्तूंची खरेदी केली होती.

बिहार आणि झारखंडमधून आरोपींना अटक

तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली. बिहारमधील गया आणि झारखंडमधील सराईकेला येथून खालील तीन आरोपींना अटक करण्यात आली.

1) अनंत कुमार नागेश्वर महातो (27 वय, गया, बिहार)

2) अजित कुमार प्रमोद सिंग (27 वय, गया, बिहार)

3) गोपाल कुमार दिनेश सिंग (33 वय, सराईकेला, झारखंड - पेशाने ऑटो ड्रायव्हर)

या टोळीमध्ये आणखी एका आरोपीचा सहभाग असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या टोळीने मुंबईत अशा प्रकारे आणखी किती जणांना लुटले आहे, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, सह-आयुक्त सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, उप-आयुक्त विजयकांत सागर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विश्वनाथ कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल देवळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळेकर, पोलीस उपनिरीक्षक राहुल शिंदे आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.

शेयर करें