मुख्य सामग्री पर जाएँ

Ashok Kharat : भोंदू बाबा खरातला पाण्याचे कनेक्शन 'मातोश्री'च्या आग्रहाखातर? शीतल म्हात्रेंच्या ट्विटने खळबळ; 'ताज'च्या राजावरून ठाकरे गटावर निशाणा

Sheetal Mahtr e On Thackeray Group : दारणा धरणातून 39 लाख लिटर पाणी मंजूर केल्याचा जीआर समोर; बंदूक परवान्याबाबतही धक्कादायक खुलासे

व
विवेक

1 मिनट पठन

Ashok Kharat : भोंदू बाबा खरातला पाण्याचे कनेक्शन 'मातोश्री'च्या आग्रहाखातर? शीतल म्हात्रेंच्या ट्विटने खळबळ; 'ताज'च्या राजावरून ठाकरे गटावर निशाणा

Sheetal Mahtre On Thackeray Group : दारणा धरणातून 39 लाख लिटर पाणी मंजूर केल्याचा जीआर समोर; बंदूक परवान्याबाबतही धक्कादायक खुलासे

मुंबई :- नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात Ashok Kharat प्रकरणाने आता थेट 'मातोश्री'च्या उंबरठ्यापर्यंत धडक दिली आहे. शिवसेना (शिंदे गट) प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केलेल्या एका स्फोटक ट्विटमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. खरातच्या संस्थेला मिळालेली पाण्याची जोडणी ही 'मातोश्री'च्या मॅडमच्या आग्रहाखातर देण्यात आली होती, असा खळबळजनक दावा म्हात्रे यांनी केला असून, "यही तो नही 'ताज' का राज?" असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

39 लाख लिटर पाणी आणि 48 किमीची पाईपलाईन

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 25 जून 2020 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत अशोक खरातच्या 'शिवनिका' संस्थेसाठी 39 लाख लिटर पाणी मंजूर करण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे, दारणा धरणापासून तब्बल 48 किलोमीटर लांब पाईपलाईन टाकून हे पाणी पुरवण्यात आले. कागदोपत्री हे पाणी पिण्यासाठी आरक्षित दाखवले असले, तरी त्याचा वापर खरातच्या 21 एकरांतील आंब्याच्या बागेसाठी केला जात असल्याचा आरोप आता होत आहे. तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या कार्यकाळात हा प्रस्ताव मंजूर झाला होता.

शीतल म्हात्रेंचा 'ट्विट' हल्ला

शीतल म्हात्रे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "क्रूरकर्मा खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी ही मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर देण्यात आली होती म्हणे… 'ताज का राज' फुटला तर यांच्या तोंडचे पाणी पळेल." या आरोपामुळे आता शिवसेना (UBT) काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बंदूक परवाना आणि 21 काडतुसे जप्त

एसआयटी (SIT) तपासात खरातच्या फार्महाऊसवरून एक बंदूक आणि 21 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये 5 वापरलेली काडतुसे असून, त्यांचा वापर नेमका कशासाठी केला, याचा तपास सुरू आहे. विशेष म्हणजे, या शस्त्राचा परवाना 15 ऑक्टोबर 2015 रोजी नाशिक जिल्हा प्रशासनानेच दिला होता आणि 1 जानेवारी 2024 रोजी त्याचे नूतनीकरणही झाले होते. आता हा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे.

शेयर करें