मुख्य सामग्री पर जाएँ

Ashadhi Wari 2026 : पुण्यात पालखी सोहळ्यासाठी ७ हजार पोलिसांचा अभूतपूर्व बंदोबस्त

Ashadhi Wari 2026 पुणे, महाराष्ट्र मिरर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी पुणे शहर पोलीस पूर्णपणे सज्ज झाले आहेत.

म
मुबारक

3 मिनट पठन

Ashadhi Wari 2026

Ashadhi Wari 2026 : एआय, जीपीएस, २२६ सीसीटीव्हींचा वापर

Ashadhi Wari 2026 पुणे, महाराष्ट्र मिरर
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी पुणे शहर पोलीस पूर्णपणे सज्ज झाले आहेत. लाखो वारकरी, भाविक आणि पर्यटकांच्या उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदा सुमारे ७ हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अभूतपूर्व बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मनुष्यबळासोबतच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्ण पालखी मार्गावर २४ तास नजर ठेवण्यात येणार आहे. (ashadhi wari 2026 pune police palkhi sohala)

Pune Rain Update :  पुण्यात पावसाचा हाहाकार! जुने वाडे, भिंती कोसळल्या

९ जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी बोपखेलमार्गे पुणे शहरात प्रवेश करून फुलेनगर येथे भोजनानंतर भवानी पेठेतील विठोबा मंदिरात मुक्कामी येणार आहे. त्याच दिवशी संत तुकाराम महाराजांची पालखी खडकी येथून नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्कामी दाखल होईल. १० जुलै रोजी दोन्ही पालख्या पुण्यात मुक्कामी राहतील. ११ जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवे घाटमार्गे सासवडकडे, तर संत तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. १२ जुलै रोजी तुकाराम महाराजांची पालखी यवतच्या दिशेने मार्गस्थ होईल. Ashadhi Wari 2026

हेही वाचा: Ashadhi Wari 2026 : यंदा मर्यादित उपस्थिती; 'असे' असेल देऊळवाड्यातील नियोजन

पोलीसदलाची जय्यत तयारी
पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेने स्वतंत्र नियोजन केले असून १ अतिरिक्त पोलीस आयुक्त, १ पोलीस उपायुक्त, ५ सहायक पोलीस आयुक्त, १४ पोलीस निरीक्षक, ५७ सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक आणि १,१२० वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. Ashadhi Wari 2026

याशिवाय कायदा व सुव्यवस्था, गुन्हे शाखा, विशेष शाखा, राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पथके, बॉम्ब शोधक व नाशक पथक, जलद प्रतिसाद पथके, महिला पोलीस, होमगार्ड आणि इतर विशेष पथकांसह एकूण सुमारे ७ हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तात सहभागी राहणार आहेत. Ashadhi Wari 2026

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

वाहतूक व्यवस्थेत बदल
८ जुलै ते ११ जुलै मध्यरात्रीपर्यंत पुणे शहरात जड, अवजड, डंपर, मिक्सर व इतर संथगती वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अंतर्गत वाहतुकीवरही निर्बंध राहतील. वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी ३३ बाह्य आणि १३२ अंतर्गत डायव्हर्शन पॉइंट तयार करण्यात आले आहेत. Ashadhi Wari 2026

७ जुलै रात्रीपासून बोपखेल फाटा आणि तुळापूर फाटा येथे सर्व प्रकारच्या वाहनांवर तात्पुरती बंदी राहणार आहे. तसेच ९ जुलै रोजी जुना पुणे-मुंबई महामार्ग आणि आळंदी रोडवर पेट्रोल-डिझेल टँकरांना प्रवेश बंद राहील. १० जुलै रोजी भवानी पेठ, नाना पेठ आणि रास्ता पेठ भागात परवानगीनेच टँकर प्रवेश करतील, तर ११ जुलै रोजी सोलापूर महामार्गावर टँकर वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

यंदा प्रथमच पावसाळा आणि पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर वाहतूक पोलीस आणि पुणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने मॉक ड्रिल घेण्यात आली. पाणी साचणे, झाडे पडणे, वीजतारा तुटणे अशा घटनांमध्ये तातडीने प्रतिसाद देण्यासाठी दोन्ही यंत्रणांमध्ये समन्वयाची यंत्रणा उभारण्यात आली आहे. Ashadhi Wari 2026

सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
सुरक्षेसाठी यंदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येणार आहे. पालखीच्या रथांवर आणि मिरवणुकीच्या अग्रभाग व शेवटच्या टोकाला एकूण १२ जीपीएस उपकरणे बसविण्यात आली असून त्याद्वारे पालखीचे रिअल-टाइम लोकेशन नियंत्रण कक्षातून पाहता येणार आहे. दोन्ही रथांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून त्यांचे थेट निरीक्षण कमांड अँड कंट्रोल सेंटरमधून केले जाईल. पालखी मार्गावर एकूण २२६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच २८ फेसियल रिकग्निशन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून हरवलेली व्यक्ती, मुले, ज्येष्ठ नागरिक आणि फरार आरोपींचा शोध घेणे शक्य होणार आहे.

याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित गर्दी व्यवस्थापन प्रणाली, वाहन व व्यक्ती मोजणी यंत्रणा, संशयास्पद वस्तू, धूर, आग, शस्त्र, मारामारी, झाड पडणे आणि महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भातील घटनांवर लक्ष ठेवणारी प्रगत व्हिडिओ अॅनालिटिक्स प्रणाली कार्यरत राहणार आहे.

विशेष पोलीस पथकांची नियुक्ती
महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष महिला पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत. चेन स्नॅचिंग, पाकिटमारी आणि इतर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेची विशेष पथके कार्यरत राहतील. संपूर्ण पालखी मार्ग आणि मुक्कामाच्या ठिकाणांची बॉम्ब शोधक व नाशक पथकांकडून तपासणी केली जाणार आहे. गर्दीच्या ठिकाणी जलद प्रतिसाद पथके कायम तैनात राहतील.

नागरिकांच्या सोयीसाठी पुणे शहर पोलिसांकडून पालख्यांचे लाईव्ह लोकेशन, वाहतुकीतील बदल, पर्यायी मार्ग आणि इतर महत्त्वाची माहिती संकेतस्थळ व समाजमाध्यमांद्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच पालखी मार्ग, विसावा आणि मुक्कामाच्या ठिकाणी पोलीस मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. Ashadhi Wari 2026

पोलीस प्रशासनाने नागरिकांना वाहतूक निर्बंधांचे पालन करण्याचे, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे.

शेयर करें