मुख्य सामग्री पर जाएँ

Mumbai News : अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; ई-मेलमुळे मुंबईत खळबळ

Mumbai News :मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या घटनेची चर्चा सुरू असतानाच आता बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; धमकीच्या ई-मेलमुळे मुंबईत खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; धमकीच्या ई-मेलमुळे मुंबईत खळबळ

Mumbai News :मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या घटनेची चर्चा सुरू असतानाच आता बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमिताभ बच्चन यांचा जुहू येथील ‘जलसा’ बंगला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीच्या ई-मेलमुळे मुंबईसह मनोरंजनसृष्टीत खळबळ उडाली आहे. Mumbai News,https://maharashtramirror.com/
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना धमकीचा ई-मेल प्राप्त झाला आहे. या ई-मेलमध्ये अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला निशाण्यावर असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. ३१ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर या कालावधीत कधीही बंगला बॉम्बने उडवून देण्यात येईल, अशी धमकी ई-मेलमध्ये दिल्याचे सांगण्यात येत आहे.

सेलिब्रिटींची घरे आणि महापौर कार्यालयालाही धमकी


मुंबईत सेलिब्रिटींची घरे, महापौर कार्यालय तसेच इतर ठिकाणांना लक्ष्य करण्याच्या धमक्या मिळाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय, गायक-अभिनेता दिलजीत दोसांझ यांच्या कॉन्सर्टमध्येही हल्ला करण्याची धमकी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
या धमकीच्या संदेशांमुळे मुंबईतील सुरक्षा व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याला देण्यात आलेल्या धमकीचे गांभीर्य लक्षात घेता, या प्रकरणातील ई-मेलची सत्यता आणि धमकीमागील व्यक्तीचा शोध घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.या धमकीप्रकरणी पोलिसांकडून काय कारवाई केली जाते आणि तपासातून कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेयर करें