मुख्य सामग्री पर जाएँ

Pune Crime : पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील गोंधळ; अमित ठाकरेंसह पंचवीस जणांवर गुन्हा

Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : गणेशखिंड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात विनापरवाना बेकायदेशीर जमाव जमवून गोंधळ घातल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्यासह वीस ते पंचवीस कार्यकर्त्यांवर चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील गोंधळ; अमित ठाकरेंसह पंचवीस जणांवर गुन्हा
पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील गोंधळ; अमित ठाकरेंसह पंचवीस जणांवर गुन्हा

Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : गणेशखिंड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात विनापरवाना बेकायदेशीर जमाव जमवून गोंधळ घातल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्यासह वीस ते पंचवीस कार्यकर्त्यांवर चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. राजेंद्र काशिराम पाटील यांनी याबाबत फिर्याद दिली.https://maharashtramirror.com/ Pune Crime

फिर्यादीनुसार, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे सोमवारी (दि.३१)गणेशखिंड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात आपले सुमारे पंचवीस पदाधिकारी, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांसह पूर्वपरवानगी न घेता महाविद्यालयीन परिसरात आणि कार्यालयात दाखल झाले. त्यांनी महाविद्यालयाच्या कार्यालयात घुसून तिथे लावलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो भिंतीवरून काढून घेतला. यानंतर त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी डॉ. राजेंद्र पाटील आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना धमकावले. तसेच कार्यालयात घोषणाबाजी करत गोंधळ घातला आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime

दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ ४) चिलुमूला रजनीकांत, सह पोलीस आयुक्त (खडकी विभाग) ब्रह्मदेव गावडे, चतुःश्रुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शितल जाधव, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे आणि सहायक पोलीस निरीक्षक छाया बोरकर यांनी भेट देउन पाहणी केली.चतुःश्रुंगी पोलीस पुढील तपास करत आहेत. तर, अमित ठाकरे यांच्यावरील या कारवाईमुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शेयर करें