मुख्य सामग्री पर जाएँ

Mumbai news : अजय देवगण-काजोलच्या जुहू बंगल्यावर बीएमसीची धडक कारवाई! स्पा आणि सलूनच्या बांधकामावर 'स्टॉप वर्क' नोटीस

Mumbai news : मुंबई :- बॉलीवूडचे स्टार कपल अजय देवगण आणि काजोल यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

अजय देवगण-काजोलच्या जुहू बंगल्यावर बीएमसीची धडक कारवाई! स्पा आणि सलूनच्या बांधकामावर 'स्टॉप वर्क' नोटीस
अजय देवगण-काजोलच्या जुहू बंगल्यावर बीएमसीची धडक कारवाई! स्पा आणि सलूनच्या बांधकामावर 'स्टॉप वर्क' नोटीस

Mumbai news : परवानगीशिवाय अंतर्गत बदल आणि व्यावसायिक बांधकामाचा आरोप; महापालिकेच्या भूमिकेमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ

Mumbai news : मुंबई :- बॉलीवूडचे स्टार कपल अजय देवगण आणि काजोल यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. मुंबईतील जुहू परिसरातील त्यांच्या बहुचर्चित बंगल्यात सुरू असलेल्या स्पा आणि सलूनच्या (Salon & Spa) प्रस्तावित बांधकामावर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) कडक पावले उचलली आहेत. पालिकेच्या नियमांचे उल्लंघन करून विनापरवाना अंतर्गत बदल आणि व्यावसायिक स्वरूपाचे बांधकाम केल्याचा ठपका ठेवत बीएमसीने या कामावर थेट 'स्टॉप वर्क' (काम थांबवा) नोटीस बजावली आहे. या धडक कारवाईमुळे बॉलिवूड वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news

अनधिकृत बांधकाम आणि नियमांचे उल्लंघन; पालिकेकडून नोटीस बजावली

अजय देवगण आणि काजोल यांचा जुहू येथील 'शिवशक्ती' हा प्रसिद्ध बंगला आहे. काही दिवसांपासून या बंगल्याच्या एका भागात स्पा आणि सलून सुरू करण्यासाठी अंतर्गत नूतनीकरण व बांधकामाचे काम सुरू होते. मात्र, हे बांधकाम करण्यासाठी पालिकेच्या संबंधित विभागाकडून आवश्यक त्या कायदेशीर परवानग्या घेण्यात आल्या नव्हत्या, असा आक्षेप स्थानिकांनी व पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे. या परिसराच्या विकास आराखड्याचे आणि रहिवासी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बीएमसीच्या अतिक्रमण व इमारत परवाना विभागाने तातडीने कारवाई करत हे काम रोखण्याचे आदेश दिले.

सेलिब्रिटींच्या मालमत्तेवरील कारवाईमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा

सामान्यांच्या बांधकामांवर कठोर कारवाई करणाऱ्या पालिकेने आता थेट बॉलिवूडमधील बड्या स्टार्सच्या बंगल्यावर नोटीस बजावल्यामुळे याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. पालिकेच्या या 'स्टॉप वर्क' नोटीसीनंतर देवगण कुटुंबीयांकडून किंवा त्यांच्या कायदेशीर सल्लागारांकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही. मात्र, या नोटिसीनंतर आता हे काम पूर्णपणे थांबवण्यात आले असून, पालिकेच्या निकषांनुसार कागदपत्रे आणि परवानग्या सादर केल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेयर करें