Aaditya Thackeray: प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी ठाण्यात वातावरण तापले; आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट
•Aaditya Thackeray and Sanjay Raut : "मुख्य सूत्रधारांना अद्याप अटक का नाही?; ठाकरे गटाचा पोलिसांवर राजकीय दबावाचा गंभीर आरोप."
1 मिनट पठन

•Aaditya Thackeray and Sanjay Raut : "मुख्य सूत्रधारांना अद्याप अटक का नाही?; ठाकरे गटाचा पोलिसांवर राजकीय दबावाचा गंभीर आरोप."
ठाणे :- ठाण्यातील बहुचर्चित प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरण आता अधिकच तापले असून, या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाले आहेत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी आज ठाण्यात प्रत्यक्ष पोहोचून मृत प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. या भेटीनंतर या दोन्ही नेत्यांनी ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेत प्रकरणाचा सविस्तर जाब विचारला.
हत्या होऊन महिना उलटला तरी या प्रकरणातील मुख्य संशयित असलेल्या मीनाक्षी शिंदे आणि राजेश शिंदे यांना अद्याप अटक न झाल्याने ठाकरे गटाने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप करत ठाणे पोलीस आयुक्तालय इमारतीबाहेर शेकडो शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र संताप व्यक्त केला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्यानंतरही कारवाई न झाल्याने रोष कायम
दरम्यान, वाढत्या वादानंतर मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या महिला जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला असला, तरी केवळ राजीनाम्याने भागणार नसून त्यांना आणि इतर दोषींना तत्काळ अटक झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे. मृतकाचे कुटुंबीय आणि ठाकरे पक्षाचे नेते या प्रकरणावर ठाम असून, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.
