मुख्य सामग्री पर जाएँ

एका तरुणीने केली दोन महिलांची ७.४५ लाखांची फसवणूक

येरवडा कारागृहात नोकरीचे आमिष दाखवले

पघ
प्रशिक घस्ते

1 मिनट पठन

एका तरुणीने केली दोन महिलांची ७.४५ लाखांची फसवणूक

येरवडा कारागृहात नोकरीचे आमिष दाखवले

पुणे: येरवडा कारागृहात ज्युनिअर क्लार्क आणि सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर या पदावर सरकारी नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून दोन महिलांची ७.४५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना १५ जुलै २०२१ ते १६ जुलै २०२५ दरम्यान किवळे येथे घडली.

या प्रकरणी एका महिलेने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खुशी वसंतराव देशमुख (बिजली नगर, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेला येरवडा जेल विभागात ज्युनिअर क्लार्क पदावर आणि तिची मैत्रीण तृप्ती निलेश दैठनकर यांना सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून सरकारी नोकरी लावण्याचे प्रलोभन दिले. यासाठी आरोपीने वेळोवेळी त्यांच्याकडून एकूण ७ लाख ४५ हजार ५०० रुपये घेतले. नोकरी न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली. रावेत पोलीस तपास करत आहेत.

शेयर करें