मुख्य सामग्री पर जाएँ

नाशिकमध्ये ‘खरात पार्ट -2’; नोकरीचे आमिष दाखवून 121 महिलांवर अत्याचार

नाशिक : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण ताजे असतानाच नाशिकमध्ये ‘खरात पार्ट-2’ समोर आला आहे.

दज
दत्तात्रय जाधव

1 मिनट पठन

nashik crime ravindra erande
nashik crime ravindra erande

तक्रारदारच निघाला सूत्रधार

नाशिक : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण ताजे असतानाच नाशिकमध्ये ‘खरात पार्ट-2’ समोर आला आहे.   या प्रकरणातील आरोपीने नोकरीचे आमिष दाखवून 121 महिलांवर अत्याचार केला आणि त्यांचे व्हिडिओ बनवले. या प्रकरणी पोलिसांनी रवींद्र गणपत एरंडे (63) याला अटक केली आहे.

वैयक्तिक डेटा असलेला टॅब चोरीला गेला असून, त्यातील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन काही लोक 12 लाखांची खंडणी मागत असल्याचा दावा करत याच रवींद्र एरंडे याने 2 एप्रिल रोजी सातपूर पोलिसांत ब्लॅकमेलिंगची तक्रार दिली होती. हा फिर्यादीच या संपूर्ण काळ्या कारनाम्याचा मुख्य आरोपी असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे सापळा रचला आणि 10 हजार रुपयांची रोकड स्वीकारताना आकाश पुंडलीक बकरे (28), प्रकाश रामदास पानपाटील (25), सूरज सुनील गवई (27) आणि श्रीपत भीमराव शिंदे (37) यांना रंगेहात पकडले.

पोलिसांनी जप्त केलेल्या टॅबची तपासणी केली असता, त्यात 121 हून अधिक महिलांचे  अश्लील व्हिडिओ आढळले.हे व्हिडिओ रवींद्र एरंडे यानेच तयार केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले, असून, पोलिसांनी त्याला अटक केली.  न्यायालयाने  एरंडेला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

nashik crime : 121 Women Exploited Under the Pretext of Job Offers

शेयर करें